शैक्षणिक संकुल परिसरात दारु दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:42 AM2017-08-03T01:42:29+5:302017-08-03T01:42:29+5:30
शिक्षणाचे संकुले असणाºया कुडूस- चिंचघर रस्त्यावर मद्याची दुकाने सुरू असून त्याला महिला मंडळाच्या सभासदांनी विरोध दर्शविला आहे. शैक्षणिक संकुलाच्या रस्त्यावर अलीकडेच सुरू झालेली
वाडा : शिक्षणाचे संकुले असणाºया कुडूस- चिंचघर रस्त्यावर मद्याची दुकाने सुरू असून त्याला महिला मंडळाच्या सभासदांनी विरोध दर्शविला आहे. शैक्षणिक संकुलाच्या रस्त्यावर अलीकडेच सुरू झालेली ही मद्याची दुकाने पूर्वी महामार्गालगत होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत ५०० मीटर अंतरातील दारूविक्री व बारबंदी झाल्यानंतर त्यांनी आपले बस्तान कुडूस शेजारच्या चिंचघर रस्त्यावर हलविले आहे.
या मार्गावर नर्सरी ते बारावी, बी. एड. महाविद्यालय आहे. ह.वि. पाटील हायस्कूल आहे. नॅशनल इंग्लिश स्कूल ही मोठी शैक्षणिक संस्था असून या व्यतिरिक्त दोन मराठी, तीन हिंदी व तीन इंग्रजी शाळा आहेत. मात्र या बाबत पो. निरिक्षक रविंद्र नाईक यांना विचारले असता त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे याची जबाबदारी असल्याचे लोकमतला सांगितले. त्यांनी विशेष परवानगी दिली असल्यास आम्ही काय करणार असा त्यांचा सूर होता. याबाबत एक्साईजचे म्हणणे काय असा सवाल येथे जनता करीत आहे.