भाजपा नेत्यांमध्ये भिंतीवरुन रंगला वाद
By admin | Published: March 8, 2017 03:00 AM2017-03-08T03:00:58+5:302017-03-08T03:00:58+5:30
बंगल्याची सुरक्षा भिंत बांधताना त्या भिंतीच्या उंची वरु न बोईसर मधील दोन भाजपाच्या नेत्यां मधील अंतर्गत वाद चांगलाच रंगला असून एकाने भिंतीच्या वादाचे रूपांतर चटई क्षेत्राचा
- पंकज राऊत, बोईसर
बंगल्याची सुरक्षा भिंत बांधताना त्या भिंतीच्या उंची वरु न बोईसर मधील दोन भाजपाच्या नेत्यां मधील अंतर्गत वाद चांगलाच रंगला असून एकाने भिंतीच्या वादाचे रूपांतर चटई क्षेत्राचा गैर वापराच्या आरोपात तर दुसऱ्याने भिंतीला विरोध करणाऱ्याला भाजपाच्या पदावरु ंन दूर करण्याच्या मागणी पर्यंत झाले आहे.
भाजपाचे जुने व जेष्ठ कार्यकर्ते व सद्या भाजपाचे बोईसर मंडळ अध्यक्ष पदावर असलेले आणि सोलंकी कॉम्प्लेक्स चे विकासक महावीर जैन व त्यांच्या बंधुच्या तीन बंगल्यांचे बोईसरला बांधकाम सुरु असून त्यांच्या बंगल्यांच्यापलीकडे मागील वर्षी भाजपामध्ये दाखल झालेल्या आणि भाजपाच्या पालघर महिला जिल्हा अध्यक्ष व प.स.सदस्य असलेल्या वीणा कृष्णा देशमुख याचा बंगला आहे. जैन यांनी दोन बंगल्या दरम्यान असलेल्या मूळ भिंती पासून काही अंतरावर नऊ फुट ऊंच भींत बांधन्यास सुरूवात करताच हवा अडली जाईल या कारणामुळे भींत बांधणीला आक्षेप वीणा देशमुख यांचे पती कृष्णा देशमुख यांनी घेतला.
येथून सुरु झालेल्या वादा नंतर कृष्णा देशमुख यांनी सोलंकी यांनी सात वर्षा पूर्वी बांधलेल्या सोलंकी कॉम्प्लेक्स मधील तिसरा मजला अनिधकृत असून या कॉम्प्लेक्सच्या बांधकामात चटईक्षेत्राच्या (एफएसआय) मंजुरीपेक्षा अधिक बांधकाम केले आहे तसेच जैन
यांनी आपल्या कुटुंबीयांचे तीन बंगल्याचे बांधकाम करताना मोकळ्या जागेचा गैरवापर करून मंजुरी
पेक्षा अधिक एफएसआय वापरल्याची तक्रार देशमुख यांनी जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे पत्राद्वारे केली
आहे.
या भिंतीच्या वादाला राजकीय आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले असून याप्रकरणी महावीर जैन यांच्या सह भाजपा चे जेष्ठ नेते व राज्य पातळी वरील पदाधिकाऱ्यानी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना प्रत्यक्ष भेटून तक्र ारकर्त्यांना पक्षातून आणि पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे.
सोलंकी कॉम्प्लेक्स मधील तिसऱ्या मजल्याला परवानगी नाही हा आरोप पूर्णपणे निराधार आहे. तसेच, वाढीव एफएसआय बाबत शासन दरबारी सर्व आवश्यक कागदो पत्रांची पूर्तता केली आहे. आमच्या बंगल्याच्या बांधकामा बाबत कोणतीही अनियमतिता नाही.
- महावीर जैन व चंदन सोलंकी