आमदार आनंद ठाकुरांच्या दगाबाजीने झाला पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:49 PM2018-05-31T23:49:26+5:302018-05-31T23:49:42+5:30
तसा पक्षाध्यक्ष शरद पवारांचा आदेशही होता असे असतांनाही राष्टÑवादीच्या पालघर जिल्हाध्यक्षांनी व विधान परिषदेच्या आमदारांनी
पालघर : काँग्रेस, राष्टÑवादी व अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांच्या आघाडीत राष्टÑवादी होता त्याने काँग्रेसच्या उमेदवाराला सर्व शक्तीनिशी पाठिंबा देण्याचे ठरविलेही होते. तसा पक्षाध्यक्ष शरद पवारांचा आदेशही होता असे असतांनाही राष्टÑवादीच्या पालघर जिल्हाध्यक्षांनी व विधान परिषदेच्या आमदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराऐवजी भाजपाच्या उमेदवाराचे काम करून माझ्या व आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसला, दगाफटका केला. त्यामुळे माझा पराभव झाला त्यामुळे आपण या गद्दारीची चौकशी करून दोषींविरूध्द कारवाई करावी असे साकडे घालणारे पत्र काँग्रेसचे पराभूत उमेदवार व ज्येष्ठ नेते दामू शिंगडा यांनी शरद पवार यांना पाठविले आहे.
त्यांनी त्यात पुढे म्हटले आहे की, आनंद ठाकूर यांच्या विरोधात विधान परिषदेत एका प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यांची फाईल उघडून चौकशी तत्परतीने करण्याची धमकी मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे घाबरून ठाकूर यांनी व जिल्हाध्यक्षांनी जिल्हयातील पक्षाचे सर्व नगरसेवक तसेच नेते आणि लोकप्रतिनिधी यांना भाजपाच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले. त्यापोटी त्यांनी भाजपाकडून भली मोठी रक्कमही स्वीकारली. ठाकूर हे भाजपात जाण्याच्या वाटेवर आहेत त्यांनी अनेक लोकप्रतिनिधींना शरद पवार आणि अजित पवार यांनी तुम्हाला भाजपच्या विजयासाठी काम करण्याचे आदेश दिलेले आहेत असे सांगितल्याचा दावा शिंगडा या पत्रात केला आहे. आता या पत्रावर राष्टÑवादी कोणती भूमिका घेते याकडे जिल्हयाचे लक्ष लागून राहिले आहे.