प्राचीन शिव मंदिराचा मार्ग केला किल्ले वसईच्या मावळ्यांनी मोकळा
By Admin | Published: January 24, 2017 05:31 AM2017-01-24T05:31:36+5:302017-01-24T05:31:36+5:30
तुंगारेश्वर अभयारण्याच्या पायथ्याशी पारोळ गावाच्या हद्दीत वाहणाऱ्या ओढ्यामध्ये काळाच्या ओघात भूमातेच्या उदरी गडप होत चाललेल्या
सुनिल घरत / पारोळ
तुंगारेश्वर अभयारण्याच्या पायथ्याशी पारोळ गावाच्या हद्दीत वाहणाऱ्या ओढ्यामध्ये काळाच्या ओघात भूमातेच्या उदरी गडप होत चाललेल्या सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या शिलाहारकालीन शिवमंदिराचा मातीत बुजलेला प्रवेशमार्ग किल्ले वसईच्या मावळ्यांनी श्रमदानाने मोकळा केला. वसई तालुक्याला लाभलेल्या ऐतिहासिक व पौराणिक काळातील अनेक खाणाखुणा सर्व दूर पाहावयास मिळत असून पूर्व विभागातील पौराणिकदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या या शिलाहारकालीन संस्कृतीचे अस्तित्व जपण्यासाठी ‘किल्ले वसई’ मोहिमेच्या प्रतिनिधींनी रविवारी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत श्रमदान करून मंदिराच्या गाभाऱ्याच्या उंबरठा मोकळा केला आहे. या वरील अत्यंत कोरीव असलेले दगडी शंख अजूनही सुस्थित आहेत. या मोहिमेची सुरुवात वास्तूदेवता पूजनाने करण्यात आली. किल्ले वसई मोहिमेचे श्रीदत्त राऊत यांनी शिलाहारकालीन उत्तर कोकण यावर दुर्गमित्रांना मार्गदर्शन केले. यामुळे येथे आता भक्तांची वर्दळ वाढेल