अंगणवाडीतार्इंचा मोर्चा
By admin | Published: July 10, 2015 10:31 PM2015-07-10T22:31:04+5:302015-07-10T22:31:04+5:30
आपल्या मागण्यांची कार्यवाही होत नसल्याने तलासरी तालुक्यातील ३०० अंगणवाडीतार्इंनी तलासरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा
तलासरी : आपल्या मागण्यांची कार्यवाही होत नसल्याने तलासरी तालुक्यातील ३०० अंगणवाडीतार्इंनी तलासरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त केला. मानधन नको वेतन हवे, बुरे दिन कोट्यवधी श्रमिक जनतेसाठी... अशा घोषणा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या मरियम ढवळे, हेमलता कोम, तलासरी पंचायत समितीचे सभापती वनशा दुमाडा यांच्या नेतृत्वाखाली ३०० अंगणवाडीतार्इंनी मोर्चा काढला. या वेळी तलासरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
अंगणवाडीताई चार हजार इतक्या अल्प मानधनावर काम करतात. या मानधनावर अंगणवाडीच्या कामाखेरीज त्यांच्याकडून इतर कामे करून घेतात. त्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. परंतु, त्यांची अंमलबजावणी करण्यात येत नाही. तसेच गेल्या पाच महिन्यांपासून अंगणवाडीतार्इंना मानधन मिळाले नसल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून संसाराचा गाडा ढकलणे त्यांना अवघड झाले आहे. अशा अनेक समस्यांचा पाढा मोर्चावेळी नेत्यांनी वाचला.