गोचीड निर्मूलनासाठी पशू विभाग सरसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:19 AM2020-10-03T00:19:03+5:302020-10-03T00:19:28+5:30
बोर्डी परिसरात मार्गदर्शन : पशुपालक, दुग्ध उत्पादकांना दाखवले प्रात्यक्षिक
बोर्डी : काँगो हमोरॅजिकफिव्हर (सीसीएचएफ) या आजाराचा गुजरात राज्यातून महाराष्ट्रात शिरकाव होण्याची शक्यता आहे. सीमाभागातील घोलवड पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे बोर्डी परिसरातील गावांमध्ये पशुपालक आणि दुग्ध उत्पादकांसाठी गोचीड निर्मूलन कार्यक्र म राबवण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य ज्योती पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पाटील यांनी उपस्थित राहून खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र-गुजरात सीमेवर डहाणू आणि तलासरी तालुक्यांचा समावेश आहे. गुजरात राज्यातून हा आजार पसरण्याची दाट शक्यता असल्याने जिल्ह्याचा पशुवैद्यकीय विभाग सक्रिय झाला आहे. डहाणू पंचायत समितीअंतर्गत घोलवड पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी-१) क्षेत्रात येणाऱ्या घोलवड, बोर्डी, चिखले, जांबुगाव, अस्वाली, खुणवडे, जळवाई, रामपूर, चिंबावे, कैनाड आदी गावांचा समावेश आहे. यामध्ये गायी ५०५६, म्हशी ६७४, शेळ्या ३०४६ या जनावरांच्या नोंदी आहेत. तर, हजारो भटकी जनावरे सीमाभागात फिरतात. ही गावे गुजरात राज्याच्या हद्दीत असल्याने पशू विभाग सक्रि य झाला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी प्रात्यक्षिक करून गोचीडनाशकांचे मोफत वाटप करण्यात आले. गोठ्याची स्वच्छता, मुखपट्टी, गमबूटचा वापर, गोचीड हाताने न काढणे व मारणे टाळा, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक!
च्जिल्हा परिषद सदस्य ज्योती पाटील म्हणाल्या की, पंचक्रोशीत पशुपालक व दुग्ध व्यावसायिकांचे प्रमाण अधिक आहे.
च्या रोगाला रोखण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यायला हवी. सीमाभागातून म्हशी, बोकड इत्यादी वाहतूक न केल्यास रोगाला आपोआपच पायबंद बसेल.
च्त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन या विभागातर्फे करण्यात आले.