मुरबाडमध्ये जनावरे फाडणारा करतो शवविच्छेदन

By admin | Published: January 5, 2017 05:25 AM2017-01-05T05:25:58+5:302017-01-05T05:25:58+5:30

मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हा रुग्णालय तसेच ट्रामा केअर सेंटरमध्ये रु पांतर झाले असले तरी येथे योग्य सुविधा तसेच मनुष्यबळ नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते

The animal is rusted in Murbad | मुरबाडमध्ये जनावरे फाडणारा करतो शवविच्छेदन

मुरबाडमध्ये जनावरे फाडणारा करतो शवविच्छेदन

Next

प्रकाश जाधव, मुरबाड
मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हा रुग्णालय तसेच ट्रामा केअर सेंटरमध्ये रु पांतर झाले असले तरी येथे योग्य सुविधा तसेच मनुष्यबळ नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे. परिणामी, आरोग्य व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. शवविच्छेदन करणारा कर्मचारी नसल्याने पशुसंवर्धन विभागात जनावरांची चिरफाड करणारा कर्मचारीच शवविच्छेदानाचे काम करतो, असे धक्कादायक वास्तव उघड झाले.
मुरबाड तालुक्यात सुमारे सात प्राथमिक आरोग्य केंद्रे असली तरी त्यांच्या कार्यक्षेत्रातील उपकेंद्रे ही अनेक वर्षांपासून बंद आहेत. ती सुरु करण्यास जि.प.आरोग्य प्रशासन हे सपशेल अपयशी ठरले आहे. विशेष म्हणजे, ही आरोग्य केंद्रे देखील शनिवार-रविवार बंदच असतात. त्म्हसा आरोग्य केंद्राला सर्वाधिक औषधांचा पुरवठा होत असताना येथील औषध साठा नेहमीच गायब होतो. रु ग्णांना इंजेक्शन देण्यासाठी लागणाऱ्या सुयादेखील आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्याने बाजारातून त्या आणण्यासाठी रुग्णांना वणवण भटकावे लागते. एखाद्या वेळेस डॉक्टर नसतील तर त्याचाही भार मुरबाड ग्रामिण रु ग्णालयावर असतो. मात्र, सुटीच्या दिवशी तेथेही डॉक्टर उपलब्ध नसल्याने प्राथमिक उपचारासाठी रुग्णांना थेट खाजगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागतो.
विकी यादव या आठ वर्षांच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. आरोग्य यंत्रणा पुरेशी सक्षम नसल्यानेच ही दुर्घटना झाली. सर्पदंशानंतर त्याला थेट मुरबाड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे आॅक्सिजनची सुविधा नसल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला थेट उल्हासनगरला पाठविले. तेथेही त्याला उपचार न मिळाल्याने १०८ या रुग्णवाहिकेने जे. जे. रुग्णालयात पाठवले. तेथेही उपचार न झाल्याने तेथून सायन आणि पुन्हा ठाणे सिव्हिल असा प्रवास मरणासन्न विकीला करावा लागला. यातील कोणत्याही ठिकाणी त्याच्यावर उपचार झाले नाहीत. अखेर त्याच्या पालकांनी ठाण्यातीलच खाजगी वेदांत हॉस्पिटल गाठले. मात्र, तेथे पोहोचेपर्यंत उशीर झाल्याने विकीचा मृत्यू झाला.
मुरबाड ग्रामीण रुग्णालयात दररोज जवळपास चारशेच्या आसपास रुग्ण येतात. तरीही आरोग्य प्रशासनाने तेथे बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि हृदयरोगतज्ज्ञांची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे किरकोळ आजार, प्रसुतीसाठी उल्हासनगर किंवा खाजगी रुग्णालयात जावे लागते.
रुग्णांना औषधे देण्यासाठी तीन औषध निर्माण अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, एकावरच जबाबदारी असल्याने त्यांच्या गैर हजेरीत शिपायाला ती भूमिका बजवावी लागते. परिचारिकांची बारा पदे मंजूर असुन केवळ आठ कर्मचारीच तेथे आहेत. प्रयोग शाळा तंत्रज्ञ तीन पैकी एक, लिपिक तीन आहेत. तरीही केस पेपरसाठी लिपिकाची गरज असताना रु ग्ण वाहिकेचे चालक किंवा सुरक्षा रक्षक केस पेपर देत असतात.
या बाबत मुंबई आरोग्य विभागाच्या सह संचालक रावखंडे यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Web Title: The animal is rusted in Murbad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.