कबुतरांच्या पाठीशी अ‍ॅनिमल वेल्फेअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 02:18 AM2019-04-12T02:18:42+5:302019-04-12T02:18:50+5:30

आयुक्तांना दिले पत्र : शहरवासीयांमध्ये गंभीर आजार पसरत असल्याने मनपा गंभीर

Animal Welfare with the support of the doves | कबुतरांच्या पाठीशी अ‍ॅनिमल वेल्फेअर

कबुतरांच्या पाठीशी अ‍ॅनिमल वेल्फेअर

Next

वसई : कबुतरांपासून होणाऱ्या आजारांमुळे वसई-विरारकर अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. श्वसनविकारासोबत इतरही आजार बळावत असल्यामुळे महापालिकेने शहरात सार्वजनीक ठिकाणी कबूतरांना खाणे टाकू नये अन्यथा दंड आकारण्यात येईल म्हणून बॅनर लावले आहेत. दरम्यान, कबुतरांपासून कोणताही आजार फैलावत नसल्याचे पुरावे सादर करत अ‍ॅनिमल वेल्फेअर कार्यकर्त्यांनी आयुक्तांना निवेदन देऊन आपण कबुतरांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले आहे.


कबुतरांना खायला घालणे, पाणी देण्याच्या सवयींमुळे नागरिक त्यांच्या संपर्कात येतात. कबुतरांच्या शरीरावरील मांस व कीटकांमुळे फुफ्फुसाला अ‍ॅलर्जी होते. त्यातुन फुफ्फुसाला सूज येते. हा आजार लवकर लक्षात येत नाही. तो जुनाट झाल्यास मृत्यू होण्याचा धोका असतो. फुफ्फुसांशी संबंधित आजार झालेल्यांमध्ये ‘हायपर सेंसेटिव्ह न्यूमोनिया’ होण्याचे आजाराचे सर्वांधिक ६० ते ६५ टक्के प्रमाण आहे. यासाठी वसई विरार महानगरपालिकेने शहरात सार्वजनीक ठिकाणी कबूतरांना खाद्यपदार्थ टाकू नये म्हणून जनजागृतीसाठी बॅनर लावले आहेत. यात जर कोणी उघड्यावर कबूतरांना खाद्यपदार्थ देताना आढळल्यास ५०० रूपये दंड आकारण्यास सुरूवात केली आहे.
याबबत अ‍ॅनिमलवेल्फेअर संघटनेचे मितेश जैन यांनी दिल्ली व एडब्ल्यूबीआयचे सदस्य गिरीश शाह यांच्याशी पत्रव्यवहार करून याबाबत कळवले होते. त्यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एबीबीआय मंडळाचे सचिव डॉ. नीलम बालाजी यांच्या समोर मांडला होता. त्यानंतर वसई विरार महानगरपालिका आयुक्तांना २ एप्रिल रोजी पत्र पाठवले होते. त्याचप्रमाणे जैन यांना जे कबूतरांना देत असलेल्या आहाराबाबतच्या नोटीसचे स्पष्टीकरण व अहवाल मागितला होता. त्यांनी त्याची एक प्रत आयुक्तांना दिली आहे.


आयुक्तांनी जैन यांना अधिसूचना रद्द करणार असल्याचे सांगीतले. त्यामूळे आता शहरात कबुतरांना सार्वजनीक ठिकाणी खाणे टाकण्यास बंदी असलेले बॅनर काढण्यात येणार आहेत. मात्र याबाबत पालिका आयुक्त बळीराम पवार यांनी,आंम्हाला याबाबत निवेदन आले असल्याचे सांगीतले असून, चौकशी नंतरच योग्य ते आदेश देण्यात येतील असे सांगीतले.
गेल्या काही वर्षात शहरामध्ये दम्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. नाक कोंदणे, श्वास घेताना त्रास होणे, दम-धाप लागण्यासह, खोकला न थांबण्याचं प्रमाणही सर्रास आढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.


५०० रु पये दंड
मुंबई महानगरपालिके पाठोपाठ कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ घालणाऱ्यांना आता पाचशे रु पयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय वसई-विरार महापालिकेने घेतला असून कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाºया जंतूंमुळे हायपरसेस्नेटीव्ह निमोनिया हा आजार होतो. तो फुफुसांशी संबंधित असून तो मुंबई -पुण्यात मोठ्याप्रमाणात आढळून आला आहे.

Web Title: Animal Welfare with the support of the doves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.