अंजली तेंडुलकरांना कायदेशीररीत्याच कनेक्शन, महावितरणचा अखेर खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:32 AM2017-11-17T01:32:58+5:302017-11-17T01:33:09+5:30

अंजली सचिन तेंडुलकर यांच्या मालकीच्या विरार येथील दोन सदनिकांना रितसर अर्ज केल्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच वीज पुरवठा देण्यात आल्याची माहिती महावितरणचे कल्याण विभागाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली.

Anjali Tendulkar legally disclosed, Connection of Mahavitaran finally revealed | अंजली तेंडुलकरांना कायदेशीररीत्याच कनेक्शन, महावितरणचा अखेर खुलासा

अंजली तेंडुलकरांना कायदेशीररीत्याच कनेक्शन, महावितरणचा अखेर खुलासा

Next

वसई : अंजली सचिन तेंडुलकर यांच्या मालकीच्या विरार येथील दोन सदनिकांना रितसर अर्ज केल्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच वीज पुरवठा देण्यात आल्याची माहिती महावितरणचे कल्याण विभागाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली.
वीज पुरवठ्यासाठी अर्ज सादर करतांना अंजली तेंडुलकर यांनी त्यांच्या खाजगी मालमत्तेविषयी सादर केलेली कागदपत्रे महावितरणच्या कार्यालयातून मागण्याचा कोणताच अधिकार नगरसेवक धनंजय गावडे यांना नाही. कारण ही बाब सार्वजनिक हिताशी संबंधित नाही. तेंडुलकर यांच्या खाजगी बाबींची माहिती मागणे बेकायदेशीर असून यामुळे एका प्रसिद्ध व्यक्तीच्या खाजगी बाबीत हस्तक्षेप केल्यामुळे त्यांना हकनाक त्रास झाला आहे. असे पवार यांनी म्हटले आहे.
महावितरणच्या विरार येथील उपकार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातून जनमाहिती अधिकारी योजना माने यांनी दिलेल्या लेखी माहितीचा खुलासा पवार यांनी केलेला नाही. तेेंडुलकर यांच्या दस्त नोंदणीची कागदपत्रे असिस्टंट इंजिनियर उमेश कदम शोधत असून ती सापडल्यानंतर उपलब्ध करून दिली जातील, असे माने यांनी लिहून दिले आहे. अधिक्षक अभियंता अरुण पापडकर यांनीही ठोस उत्तर दिलेले नाही. खाजगी माहिती देता येत नाही असे पवार म्हणत असले तरी त्यांच्याच वरिष्ठ अधिकाºयांच्या कार्यालयाने दस्तऐवज शोधले जात असल्याचे उत्तर कसे दिले? हा प्रश्न कायम आहे.

Web Title: Anjali Tendulkar legally disclosed, Connection of Mahavitaran finally revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.