आर्थिक फसवणुकीत आणखी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:09 PM2019-02-24T23:09:18+5:302019-02-24T23:09:22+5:30
चौघा आरोपींना १४ दिवसांची कोठडी : मुद्रा योजनेतील कर्ज प्रकरणात तपासाला धार
बोर्डी : मुद्रा योजनेतून बँकेमार्फत कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तिघांसह आणखी एकास अटक झाली आहे. या घोटाळ्यात बँकेला दोन लाखांचे बनावट कोटेशन दिल्याचा ठपका येथील शारदा नोव्हेल्टि दुकानाचे मालक नरेश चौधरी यांच्यावर फिर्यादी साधना रसाळ या गृहिणीने ठेवला आहे. या प्रकरणी ही चौथी अटक असून शुक्र वारी डहाणू न्यायालयाने चौघांना, चौदा दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना लघु उद्योगाकरिता बँकेकडून दोन लक्ष रु पयांचे कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने मनीषा रसाळ, संजय रसाळ, विकी जयस्वाल, या तिगडींनी लाखोंचा गंडा घातला आहे. त्यांच्यावर डहाणू आणि कासा पोलिसात गुन्हा दाखल असून अटक झाली आहे. तर चौथा आरोपी फरार आहे. दरम्यान, या प्रकरणात फसवणूक झालेल्यांची नावं समोर येत असताना दुसरीकडे आरोपींच्या संख्येत वाढ होऊन धरपकडीचे सत्र सुरू आहे. या आर्थिक फसवणुकीत बँकेला कर्जदाराच्या नावे बनावट कोटेशन सादर केल्याचा ठपका डहाणू शहरातील शारदा नोव्हेल्टिचे मालक नरेश चौधरी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांनी सौदर्यप्रसाधनाच्या वस्तूंचे खोटे कोटेशन माझ्या नावे दिल्याची तक्र ार साधना विनोद रसाळ (राहणार, ओसरविरा) हिने केल्यानंतर चौधरीला अटक करण्यात आली.
आरोपी रसाळ दाम्पत्य हे फिर्यादीचे थोरले जाऊ व दीर
च् आरोपी रसाळ दांपत्य हे फिर्यादीचे थोरली जाऊ व दीर आहेत. त्यांनी मे २०१६ साली कासा येथील बँक आॅफ महाराष्ट्राच्या चारोटी शाखेत राज्य नागरी उपजिविका अभियान, वैयिक्तक स्वयंरोजगार कर्ज
व अनुदान या शासकीय योजनेकरिता कर्ज मंजूर करण्याकरिता अर्जावर सही घेतली होती. शिवाय ब्युटी पार्लरकरिता कर्ज मिळवून देण्यासाठी कागदपत्रं व फोटो घेतले होते.