‘कोमसाप’तर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:01 AM2019-06-28T00:01:13+5:302019-06-28T00:01:52+5:30
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङ्मय पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात.
पालघर - कोकण मराठीसाहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङ्मय पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. डिसेंबर २०१९ मध्ये घोषित होणाऱ्या वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके मागविण्यात येत आहेत. हे सर्व पुरस्कार कोसमापचे कोकणातील सभासद असणाºया लेखकांसाठी आहेत.
प्रथम श्रेणीचे सात पुरस्कार प्रत्येकी पाच हजार रूपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र आहेत. कादंबरी, कथा, कविता, समिक्षा ललित गद्य, चरित्र-आत्मचरित्र, चित्रपटविषयक पुस्तकांकरिता पुरस्कार दिले जातील.
विशेष पुरस्कार प्रत्येकी तीन हजार रूपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे सात पुरस्कार असून त्यामध्ये कादंबरी, कथा, कविता, बालवाङ्मय, संकिर्ण गद्य, नाटक एकांकिका, विद्याधर भागवत कथासंग्रह पुरस्कार, वसंत सावंत कविता संग्रह पुरस्कार, श्रीकांत शेट्ये च्ािरत्र, आत्मचिरत्र पुरस्कार, प्र.श्री.नेरूरकर बालवाङ्मय पुरस्कार, वि.कृ.नेरूरकर संकिर्ण वाङ्मय पुरस्कार, अरूण आठल्ये संकिर्ण वाङ्मय पुरस्कार, रमेश किर नाटक, एकांकिका पुरस्कार, वैचारिक साहित्यासाठी फादर स्टीफन सुर्वाता वसई पुरस्कार आहेत.
पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती ३० सप्टेंबर २०१९ पूर्वी पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा.अशोक ठाकूरद्वारा सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर, ता.जि.पालघर , पिन कोड ४०१ ४०४ यांचेकडे पाठवाव्यात. त्यासाठीचे नियम व अटींची माहिती हवी असल्यास ashokthakur46@gmail.com या ईमेल आयडीवरून मागवून घ्यावी असे आवाहन केले आहे.