शिक्षकांच्या नेमणुका करा शाळांच्या पटसंख्येप्रमाणे! अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 04:12 AM2018-09-03T04:12:11+5:302018-09-03T04:12:19+5:30
या तालुक्यात २३५ शाळापैकी २० शाळा या २० पेक्षाही कमी पटसंख्या असलेल्या असून या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहे त्यामुळे त्यातील एक शिक्षक जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत नियुक्त करा अशी, मागणी माकपाचे राजा गहला यांनी केली आहे.
विक्रमगड : या तालुक्यात २३५ शाळापैकी २० शाळा या २० पेक्षाही कमी पटसंख्या असलेल्या असून या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहे त्यामुळे त्यातील एक शिक्षक जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत नियुक्त करा अशी, मागणी माकपाचे राजा गहला यांनी केली आहे.
पूर्वी आम्हांला शिकता आले नाही पंरतु आमच्या मुलांना चांगले शिकता यावे यासाठी पटसंख्येनुसार आवश्यक शिक्षकांची नेमणुक करण्याची मागणी त्यांनी केली आहे त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली . तालुक्यात ज्याची पटसंख्या शंभराच्या जवळपास अशा शाळांत एकच शिक्षक आहे व २० पेक्षाही कमी पटसंख्या त्या शाळेत दोन शिक्षक आहेत हा विरोधाभास दूर करून कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील एक शिक्षक जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळेला देण्यात यावा अशी मागणी माकपने केली आहे.
तालुक्यात गोडपाडा येथे ११७ पटसंख्या पण शिक्षक एक, तर म्हसेपाडा येथे पटसंख्या ९ शिक्षक दोन असा विरोधाभास असणाºया अनेक शाळा आहेत.
याबाबत लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर शिक्षण विभागाविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे
याबाबत शिक्षणाधिकारी मोकाशी यांना विचारले असता तालुक्यात २६ शाळाचा अतिरिक्त शिक्षक नेमणुकीचा प्रस्ताव पाठविला आहे हे अधिकार जिल्हा परिषदेला असून फेरबदल ते करतील.
तालुका स्तरावर अधिकारी नाहीत त्यामुळे शिक्षकांची बदली करता येत नाही शाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले असतांनाही या हालचाली झाल्या नाही म्हणजे शिक्षण विभाग किती कार्यक्षम आहे दिसून येते, अशी टीका त्यांनी केली.
१५६ जागा रिकाम्या
तसेच तालुक्यातील १९ शिक्षकाच्या बाहेर बदल्या झालेल्या आहेत व त्याबदल्यात फक्त पाच शिक्षक देण्यात आले आहेत. त्यातील दोनच हजर झाले तालुक्यात ७२ शिक्षक, ७७ पदवीधर शिक्षक, व ७ मुख्याधापक यांच्या जागा रिक्त आहे या जागाही भराव्यात अशीही मागणी माकपने सरकारकडे केली आहे