अप्पर पोलीस अधिक्षकांना अ‍ॅट्रोसिटी लावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 05:03 AM2018-08-28T05:03:45+5:302018-08-28T05:04:12+5:30

शेतकऱ्यांच्या जमिनीतून रिलायन्स कंपनीची गॅसपाईप लाइन टाकण्याच्या कामाची योग्य भरपाई मिळावी अशी, न्याय्य मागणी करणाºया बिलोशी येथील दलित शेतकºयांना मारहाण करणाºया अपर पोलीस अधीक्षक

Approach the Super Police Superintendent! | अप्पर पोलीस अधिक्षकांना अ‍ॅट्रोसिटी लावा!

अप्पर पोलीस अधिक्षकांना अ‍ॅट्रोसिटी लावा!

Next

हितेन नाईक

पालघर : शेतकऱ्यांच्या जमिनीतून रिलायन्स कंपनीची गॅसपाईप लाइन टाकण्याच्या कामाची योग्य भरपाई मिळावी अशी, न्याय्य मागणी करणाºया बिलोशी येथील दलित शेतकºयांना मारहाण करणाºया अपर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
गुजरातच्या दाहेज येथून नागोठणे येथे जाणारी गॅस पाईपलाइन पालघर जिल्हयातून जात असून २५ आॅगस्ट रोजी वाडा तालुक्यातील बिलोशी गावातून काही शेतकºयांच्या सुपीक जमिनी मधून जात असतांना तेथे उपस्थित शेतकºयांशी अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांच्याशी शाब्दिक चकमक उडाली. त्यांनी शेतकरी मुनिराज गायकवाड ह्यांच्या श्रीमुखात लगावली आणि अन्य १२ शेतकºयां विरोधात सरकारी कामात अडथळा आणला व हल्ला करण्याचा प्रयत्न केला. असे गुन्हे दाखल केले. हे सर्व शेतकरी सध्या तुरु ंगात आहेत.

आज सेनेचे आ. रवींद्र फाटक, आ.अमित घोडा, सहसंपर्क प्रमुख श्रीनिवास वनगा, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण, राजेश शहा, पालघर विधानसभा प्रमुख वैभव संखे, तालुकाध्यक्ष विकास मोरे, उपतालुका प्रमुख निलम संखे, जि.प. उपाध्यक्ष निलेश गंधे, सभापती ज्योती मेहेर, ज्योती ठाकरे आदींनी बाधित शेतकºयांच्या नातेवाईकांसह उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुने ह्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
रिलायन्सच्या पाईपलाईनचे काम हे खाजगी असतांनाही जिल्हाधिकारी आणि पोलीस रिलायन्सचे नोकर असल्या प्रमाणे काम करीत असल्याचा आरोप आ. फाटक ह्यांनी केला. नुकसान भरपाई मध्ये विसंगती असून जो जास्त विरोध करतो त्याला जास्त भरपाई दिली जाते असे फाटक यांनी सांगितले.पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत ह्या साठी आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून तात्काळ गुन्हे मागे न घेतल्यास सेनेच्या वतीने आंदोलन उभारले जाईल असा इशारा त्यांनी दिला.
बिलोशी गावात पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचारामुळे अनेक घरात चार दिवसांपासून चूलच पेटली नसून संपूर्ण गाव दहशतीखाली वावरत असल्याचे अटक केलेल्या गायकवाड यांची पत्नी मनीषा गायकवाड ह्यांनी पत्रकारांना सांगितले. अटकसत्रा नंतर पोलीस बंदोबस्तात पाईपलाईन टाकण्याचे काम पोलिसांनी जबरदस्तीने पहाटेपर्यंत करून घेतल्याचा आरोप ह्यावेळी बाधित कुटुंबियानी केला. आम्हा दलित समाजाच्या १३ पैकी ११ लोकांवर अधीक्षक चव्हाण यांनी आकसाने कारवाई केली असून त्यांच्यावर आणि रिलायन्स पाईपलाईनचे काम करणारा दलाल आणि भाजप कार्यकर्ता योगेश पाटील यांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनीषा गायकवाड ह्यांनी केली आहे.

रिलायन्स पाईपलाईन बाबत अनेक दलालांनी मोठी रक्कम घेतली असून ती एकित्रत रक्कम जमा करून ती बाधित शेतकर्यांना दिली असती तर शेतकर्यांनी स्वखुशीने आपल्या जमिनी रिलायन्सला दिल्या असत्या.
- निलेश सांबरे,
सामाजिक कार्यकर्ता, झडपोली

Web Title: Approach the Super Police Superintendent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.