पालघर जिल्ह्यात फक्त ९१८ शेतकऱ्यांना माफी
By Admin | Published: July 7, 2017 06:00 AM2017-07-07T06:00:07+5:302017-07-07T06:00:07+5:30
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील कर्जमाफी लाभधारकांची
निखिल मेस्त्री/लोकमत न्यूज नेटवर्क
नंडोरे : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील कर्जमाफी लाभधारकांची जिल्हानिहाय यादी ट्विटरद्वारा जाहीर केली असून यामध्ये पालघर जिल्ह्यातील केवळ ९१८ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे दर्शविण्यात आल्याने जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे तर शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
याबाबतीत जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाला जिल्ह्यामार्फत दीड लाखापर्यंत व दीड लाखावरील १९ हजार ३१४ लाभार्थींची संख्या व माहिती पाठविल्याचे स्पष्ट केले.यानंतर शासन निर्णयानुसार २०१२ व आता २००९ पर्यंतचे पात्र लाभार्थींची निश्चित संख्या व माफ होणाऱ्या कर्जाची रक्कम यासंबंधीची माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सहकार विभागाने पाठविलेल्या यादीनुसार दीड लाखापर्यंतची कर्जमाफी मिळू शकणाऱ्यांची संख्या १६,६४३ आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर निघालेल्या शासन निर्णयानुसार १ एप्रिल २०१२ पासूनचे थकबाकीदार पात्र धरण्यात आले आहेत आणि पालघर सारख्या आदिवासी ग्रामीण भागातून मुंबई जिल्ह्याइतकीच (८१३) संख्या दिसूनही मुख्यमंत्र्यांना या संख्येबद्दल शंका निर्माण होऊ नये याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे.
हा आकडा आला कुठून?
काल मुख्यमंत्रीनी यात बदल करून २००९ पासूनच्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल असे म्हटले आहे शासनाच्या या निर्णयामुळे सहकार विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या यादीतील पात्र लाभार्थींची संख्या घटू शकते हे खरे असले तरी मुख्यमंत्र्यांनी ट्विट केल्याप्रमाणे १९ हजारांपैकी १० हजार शेतकरी यातून बाद होणे असंभव आहे.त्यामुळेच ९१८ हा आकडा आला कुठून ?