खोलसापाडा -१ धरणासाठी ३४८ एकर वनजमीन देण्यास मंजुरी; वसई-विरारकरांना दिलासा

By नारायण जाधव | Published: August 22, 2022 04:11 PM2022-08-22T16:11:07+5:302022-08-22T16:11:32+5:30

केंद्राने हिरवा कंदील दिल्याने राज्य शासनाचा निर्णय : वसई-विरार महापालिकेला मिळणार ७०एमएलडी पाणी

Approval to grant 348 acres of forest land for Kholsapada-1 Dam; Relief to Vasai-Virar | खोलसापाडा -१ धरणासाठी ३४८ एकर वनजमीन देण्यास मंजुरी; वसई-विरारकरांना दिलासा

खोलसापाडा -१ धरणासाठी ३४८ एकर वनजमीन देण्यास मंजुरी; वसई-विरारकरांना दिलासा

Next

नारायण जाधव

नवी मुंबई : वसई विरार शहराची लोकसंख्या आजघडीला २२ लाखांच्या घरात असून, या लोकसंख्येला ३५० एमएलडी इतक्या पाण्याची गरज आहे. मात्र, सद्यःस्थितीत शहराला २३० एमएलडी इतकाच पाणीपुरवठा होत आहे. शहराला सूर्या धरणातून १८५, उसगाव धरणातून २०, पेल्हार धरणातून १४ आणि फुलपाडा पाणी योजनेतून दीड एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय महापालिकेला खोलसापाडा-१ व खोलसापाडा-२ धरण योजनेतून ७० एमएलडी पाण्याची प्रतीक्षा आहे. याच खोलसापाडाच्या टप्पा १ साठीसाठी आवश्यक असलेल्या १३९.४७३ हेक्टर अर्थात ३४८.६८ एकर वनजमीन देण्यास केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्याने राज्याच्या वन विभागानेही सोमवारी ती वळती करण्यास अंतिम मंजुरी दिली. यामुळे वसई-विरार महापालिकेच्या धरणाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

हे धरण पूर्ण झाल्यानंतर मुंबई व नवी मुंबई महापालिकेनंतर स्वतःच्या मालकीचे धरण असलेली वसई-विरार दुसरी, तर पालघर जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे. भविष्यात एमएमआरडीएच्या विकास आराखड्यानुसार वसई-विरारची लोकसंख्या पुढील २० वर्षांत ४५ लाख होणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येसाठी महापालिकेने विविध योजनांवर काम सुरू केले आहे. यात खोलसापाडा धरणाच्या टप्पा क्रमांक १ आणि टप्पा क्रमांक २ चे काम प्रस्तावित केले आहे. यासाठी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यासाठी २३१ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद केली आहे. खोलसापाडा टप्पा क्रमांक १ आणि टप्पा क्रमांक २ या स्वतंत्र योजना आहेत. त्यातून ७० दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे. 

३९.६७२ हेक्टर संरक्षित वनाचा समावेश
सोमवारी जी १३९.४७३ हेक्टर वनजमीन वळती करण्यास मंजुरी दिली आहे, त्या राखीव वन ९९.८०१ हेक्टर, तर वूडलँड संरक्षित वन जमीन ३९.६७२ हेक्टर आहे. भारत सरकारच्या वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अटी व शर्तीनुसार या वनांवर धरण उभारावयाचे आहे. यात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होणार असून, सात गावच्या हद्दीतील अनेक आदिवासी पाडेही बाधित होणार आहेत.

* या गावांतील जमीन जाणार*
गावाचे नाव- राखीव वन- संरक्षित वन
कंरजोन-९७.४६१ हेक्टर- ७.४० हेक्टर
तिल्हेर - ०००- ८.५७७ हेक्टर
दीपिवली-०००- ३.८२५हेक्टर
पारोळ- २.३४० हेक्टर-४.५९१ हेक्टर
उसगाव- ०००-९.३८३ हेक्टर
शिवनसाई-०००-४.५२३ हेक्टर
चांदीप-०००-१.३७३ हेक्टर
एकूण-९९.८०१ हेक्टर - ३९.६७२ हेक्टर

Web Title: Approval to grant 348 acres of forest land for Kholsapada-1 Dam; Relief to Vasai-Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.