युनियन बँकेत मनमानी

By admin | Published: January 9, 2017 05:56 AM2017-01-09T05:56:01+5:302017-01-09T05:56:01+5:30

युनियन बॅकेत कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असून खाते उघडून देण्याबाबत ते टाळाटाळ करीत असल्याचा आरोप

Arbitrarily | युनियन बँकेत मनमानी

युनियन बँकेत मनमानी

Next

वाडा : युनियन बॅकेत कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असून खाते उघडून देण्याबाबत ते टाळाटाळ करीत असल्याचा आरोप किसानसभेचे अध्यक्ष सुनिल पाटील यांनी केला.
या बाबत तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, खाते उघडण्यासाठी जाणा-या महिला बचत गट, जेष्ठ नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांना कर्मचारी खाते उघडण्यासाठी फॉर्म देत नाहीत. तुम्ही सायबर कॅफेमध्ये जा तिथे तुम्हाला आॅन लाईन फॉर्म भरून मिळेल. असे सांगितले जाते. सायबर मध्ये एक फॉर्म भरून देण्यासाठी १०० रूपये रोख मोजावे लागतात. गरिब आदिवासींना ही रक्कम भरणे शक्य नसल्याने ते हिरमुसले होऊन खाते न उघडताच जातात. काही पदरमोड करून सायबर कॅफेतून फॉर्म भरतात. या बाबीची गंभीर दखल घेऊन सबंधीतावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी संघटनेच्या वतीने केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Arbitrarily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.