अनधिकृत बांधकामांना १५ दिवसांत चाप

By Admin | Published: June 11, 2017 02:47 AM2017-06-11T02:47:29+5:302017-06-11T02:47:29+5:30

आगरी सेना, शिवसेना व रिपिब्लकन पक्ष (ए) यांनी यांच्या मागणीनुसार राखीव व अतिक्रमित जमीनींवर व अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी तसेच संबंधितांवर

The arc for unauthorized construction within 15 days | अनधिकृत बांधकामांना १५ दिवसांत चाप

अनधिकृत बांधकामांना १५ दिवसांत चाप

googlenewsNext

- लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : आगरी सेना, शिवसेना व रिपिब्लकन पक्ष (ए) यांनी यांच्या मागणीनुसार राखीव व अतिक्रमित जमीनींवर व अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी तसेच संबंधितांवर एमआरटीपी व ४२० आदि कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी आयुक्त लोखंडे यांनी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. ही कारवाई करा अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या पक्षांनी महापालिकेला दिला होता, . आयुक्त सतीश लोखंडे यांनी उपोषणकर्त्यांना चर्चेसाठी शुुक्रवारी पाचारण केले होते. यावेळी लोखंडे यांनी १५ दिवसांची मुदत मागितली. जनार्दन मामा पाटील व इतरांनी आयुक्तांकडे लेखी आश्वासन मागितले. जर १५ दिवसात योग्य ती कारवाई महापालिकेने केली नाहीं तर बेमुदत उपोषण करु व आयुक्तांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला.
यावेळी आगरी सेना, शिवसेना व आरपीआई (ए) यांनी हा आमचा विजय असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे, आरपीआई चे शहर अध्यक्ष गिरीश दिवाणजी व आगरी सेनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन मामा पाटील यांनी दिली.

Web Title: The arc for unauthorized construction within 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.