वसई अन् जव्हारमध्ये मात्र सेना-भाजप ‘युती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:24 AM2020-02-16T00:24:12+5:302020-02-16T00:24:31+5:30
संडे अँकर । वसईत शिवसेनेचा सभापती, भाजपचा उपसभापती; बहुजन विकास आघाडीला ठेवले सत्तेपासून दूर
पारोळ : राज्यात शिवसेना-भाजप एकत्र आले नसले तरी वसई पंचायत समितीत मात्र बहुजन विकास आघाडीला दूर ठेवण्यासाठी ‘युती’ची सत्ता स्थापन झाली आहे. शनिवारी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनुजा अजय पाटील सभापती, तर भाजपच्या वनिता तांडेल यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. दरम्यान, शिवसेना व भाजप यांची राज्यात युती तुटली असली तरी वसईत आणि जव्हारमध्ये ‘युती’ झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
७ जानेवारी रोजी पार पडलेल्या वसई पंचायत समिती निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. यात वसई तालुक्यातील ८ गणांपैकी ३ गणांत बहुजन विकास आघाडीला, ३ गणांत शिवसेनेला आणि २ गणांत भाजपला विजय मिळाला होता. सत्तास्थापनेसाठी ५ हा आकडा महत्त्वाचा असल्याने बविआ आणि शिवसेनेला साहजिकच भाजपच्या दोन विजयी उमेदवारांवर अवलंबून राहावे लागणार होते.
महाराष्ट्रात शिवसेना व भाजप यांची युती न होता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्याने वसई पंचायत समितीत सत्तेसाठी युती होणार नाही, असे राजकीय जाणकारांनी वर्तवले असतानाच शिवसेना-भाजप यांची वसई पंचायत समितीत युती झाल्याने सर्व राजकीय गणिते बदलली आहेत.
वसई पंचायत समितीच्या बहुजन विकास आघाडी व शिवसेना यांना सत्तेसाठी समान संधी होती. पण त्यासाठी भाजपची साथ आवश्यक होती. यामुळे भाजप कोणासोबत जाते याकडे वसईकरांचे लक्ष लागले होते. सभापतीसाठी आरक्षण हे ओबीसी महिला असे पडले होते. त्यामुळे बहुजन विकास आघाडी व शिवसेना यांच्याकडे ओबीसी महिला होत्या, पण सभापती निवडणुकीत भाजपने उपसभापतीपद घेत आपले समर्थन सेनेला दिल्याने तिल्हेर गणातून सेनेतून निवडून आलेल्या अनुजा पाटील यांना सभापतीपदाचा मान मिळाला. वसई पंचायत समितीवर सभापती व उपसभापती महिला झाल्याने समितीवर महिलाराज आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क