Video - चिमुकल्या आरोहीची कोटीच्या-कोटी उड्डाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 03:48 PM2019-03-26T15:48:35+5:302019-03-26T16:36:12+5:30

किड्स मेमरी रेकॉर्डसचे चार विक्रम नावावर नोंदवणार्‍या वाणगाव येथील आरोही विजय पावबाके हिने आता चक्क कोटींची संख्या अचूकपणे म्हणण्याची किमया साधली आहे.

Arohi Vijay Pawbake youngest kid telling numbers | Video - चिमुकल्या आरोहीची कोटीच्या-कोटी उड्डाणे

Video - चिमुकल्या आरोहीची कोटीच्या-कोटी उड्डाणे

Next
ठळक मुद्देआरोही विजय पावबाके हिने आता चक्क कोटींची संख्या अचूकपणे म्हणण्याची किमया साधली आहे. टू झीरो 20, थ्री झीरो 30 म्हणताना वन झीरो वनटी का होत नाही असे प्रश्न तिला पडू लागले.कॅल्क्युलेटर किंवा कॉलकरिता मोबाईलवर नंबर डायल करतेवेळी दहा अंकी संख्या वाचता याव्यात म्हणून तिने हट्टच धरला.

अनिरुद्ध पाटील 

डहाणू/बोर्डी - किड्स मेमरी रेकॉर्डसचे चार विक्रम नावावर नोंदवणार्‍या वाणगाव येथील आरोही विजय पावबाके हिने आता चक्क कोटींची संख्या अचूकपणे म्हणण्याची किमया साधली आहे. आरोही बी. एम. टी. हायस्कूलच्या नर्सरी वर्गात शिकते. 

तालुक्यातील जिल्हा परिषद गोवणे मराठी शाळेतील प्रयोगशील शिक्षक विजय पावबाके यांची आरोही ही साडेचार वर्षीय कन्या आहे. सरला आणि विजय पावबाके या पालकांनी तिला काही दिवसपूर्वी शंभरपर्यंतचे इंग्रजी अंक शिकविण्यास सुरुवात केली. कुशाग्र बुद्धिमतेमुळे तिने ते लगेचच अवगत केले. शिवाय दिवसभरात घरातील भिंतीवरील फळ्यावर ती स्वत: अंक लिहायचा व वाचायचा सरावही करू लागली. परंतु असं असताना तिचे लहान वय लक्षात घेता, शंभर पुढील अंक आताच शिकविणार नसल्याचे पालकांनी ठरविले. दरम्यान या काळात नोटांवरील संख्या, गाड्यांचे नंब रप्लेट्स तसेच इमारतीवर लिहलेले अंक ती वाचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. तर त्यासह टू झीरो 20, थ्री झीरो 30 म्हणताना वन झीरो वनटी का होत नाही असे प्रश्न तिला पडू लागले. त्यानंतर चक्क कॅल्क्युलेटर किंवा कॉलकरिता मोबाईलवर नंबर डायल करतेवेळी दहा अंकी संख्या वाचता याव्यात म्हणून तिने हट्टच धरला. मग मात्र तिला पहिल्या दिवशी शंभर, दुसर्‍या दिवशी हजार, त्यानंतर लक्ष आणि त्याही पुढे जात चौथ्या दिवशी कोटीपर्यंतचे अंक शिकविण्यात आले. आश्चर्य म्हणजे ते ती अचूक म्हणूही लागल्याने पालक अक्षरशः भारावले. 

बोबड्या बोलीने काऊ-माऊच्या गोष्टी, बडबड गीते म्हणण्याच्या वयात आरोहीचा प्रवास थक्क करणारा असल्याने आनंदी असल्याचे सांगत, यापुढे तिने आमच्या समोर मोठे चॅलेंज उभे केले आहे. त्याकरिता आम्हाला सजग, तत्पर राहावे लागत असून नवनवीन ज्ञान शिकण्याचा अभ्यास करावा लागत असल्याचे सरला बावबाके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डच्या किड्स मेमरी गटात तिने पाठांतर क्षमतेच्या जोरावर यंगेस्ट टू रीड अँड रिसाईट इंग्लिश अल्फाबेट्स, मोस्ट नंबर ऑफ इमेजेस आयडेंटिफाय (190 इमेजेस), यंगेस्ट टू रिसाईट मोअर दॅन 30 राइम्स आणि यंगेस्ट टू रिसाईट लोंगेस्ट राइम्स हेविंग 20 लाईन्स या चार रेकॉर्डची नोंद चक्क वयाच्या दुसर्‍या वर्षी केली आहे. 

 

Web Title: Arohi Vijay Pawbake youngest kid telling numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.