सहा वर्षांपासून फरार आरोपीला अटक; अपहरण झालेल्या मुलीचीही सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:15 PM2020-03-11T23:15:55+5:302020-03-11T23:16:21+5:30
नाव बदलून राहत होते अलिबागला
नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय आरोपीने एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना सहा वर्षांपूर्वी घडली होती, तेव्हापासून फरार झालेल्या आरोपीला अटक करून अपहरण झालेल्या मुलीची अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाने अलिबाग येथून सुटका केली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव परिसरात राहणाºया संतोष नारायण घरवे (४०) याने १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर तो पळून गेला होता. अपहृत मुलीच्या घरच्यांनी आजूबाजूला शोध घेतल्यावर ती न सापडल्याने नालासोपारा पोलीस ठाण्यात १४ आॅक्टोबर २०१४ रोजी तक्रार देऊन अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी आणि मुलगी गायब असल्याने, पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी गुन्ह्याची उकल करण्यासाठी हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक शाखेला वर्ग केला होता. या गुन्ह्यातील आरोपी त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी नालासोपारा येथे येणार असल्याची माहिती सहा. पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांना खबºयाकडून मिळताच त्यांनी पोलीस अधीक्षकांना सदर माहिती दिली. १० मार्चला धुळवडीच्या दिवशी आरोपीला ताब्यात घेऊन अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीलक्ष्मी बोरकर यांच्या ताब्यात दिलेले होते. आरोपी अलिबागच्या वायशेत येथे अमोल मोरे आणि मुलगी शिवानी मोरे या खोट्या नावाने भाड्याने राहत होते. ही मुलगी अलिबाग येथे असून तिला घेण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पथक रवाना झाले होते.
खबºयाकडून मिळालेल्या माहितीनंतर आरोपीला सोमवारी रात्री नालासोपाºयातून पकडले. अपहरण झालेली मुलगी कुठे आहे, ती जिवंत आहे की नाही, याची शंका होती. त्यामुळे तिचा ठावठिकाणा कळल्यावर पोलिसांनी मंगळवारी तिची सुटका केली.
- सुरेंद्र शिवदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पालघर
अपहरण झालेल्या मुलीची अलिबाग येथून मंगळवारी आमच्या पथकाने सुखरूपपणे सुटका केली असून तिला नालासोपाºयात आणले आहे. बुधवारी अपहरण मुलगी आणि आरोपीला नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात तपासासाठी दिले आहे. - भास्कर पुकळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक शाखा, वसई