मंगल कार्यालयप्रकरणी अटक
By admin | Published: October 13, 2016 03:21 AM2016-10-13T03:21:28+5:302016-10-13T03:21:28+5:30
विक्रमगड तालुक्यातील खूडेद च्या घोडीचा पाडा येथील ९ लाख ९९ हजार ५३० रुपयाच्या मंगल कार्यालय सभागृहाची रक्कम हडप केल्या प्रकरणी पाच आरोपी
पालघर : विक्रमगड तालुक्यातील खूडेदच्या घोडीचा पाडा येथील ९ लाख ९९ हजार ५३० रुपयाच्या मंगल कार्यालय सभागृहाची रक्कम हडप केल्या प्रकरणी पाच आरोपी विरोधात दोषी असलेल्या पैकी ठेकेदार मोहंमद फैझल ह्याला विक्रमगड पोलिसांनी बुधवारी मुब्रा येथून ताब्यात घेतले. तर अभियंता नितीन पालवे ह्यांनी उच्च न्यायालयातून अंतरिम जामीन मिळविल्याने तूर्तास त्यांची अटक टळली आहे.
मंगल कार्यालयाची इमारत न बांधतात ते बांधले गेल्याचे बनावट कागदपत्रा द्वारे दाखवून सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हारचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे, विक्रमगडचे उपअभियंता सुदाम ससाणे, ठेकेदार सिद्दीकी महंमद फैजल, आदिवासी विकास निरीक्षक एस जी भोये, सरपंच प्रदीप पाडवी ह्या पाच जना विरोधात भादवी कलम ४०९ , ४२० (फसवणूक करणे), ४६७ (बनावट दस्तावेज बनविणे), १७७ (खोटी माहिती पुरवणे, १२० ब (गुन्हेगारी कट) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ह्या आरोपी पैकी काल रात्री मुब्रा येथून ठेकेदार मोहंमद फैझल ह्याला ताब्यात घेत चौकशी अंती आज अटक केली. आज त्याला जव्हारच्या न्यायालयात हजर केल्याची माहिती विक्रमगड चे पोलीस निरीक्षक विजय शिंदे ह्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)