कला, खेळ आणि शिक्षण महत्वाचे

By Admin | Published: February 22, 2017 05:48 AM2017-02-22T05:48:29+5:302017-02-22T05:48:29+5:30

कोणतीही कला, खेळ आणि कोणत्याही भाषेत घेतलेले शिक्षण याला जीवनात अनन्य साधारण महत्व आहे

Art, sports and education are important | कला, खेळ आणि शिक्षण महत्वाचे

कला, खेळ आणि शिक्षण महत्वाचे

googlenewsNext

वसई : कोणतीही कला, खेळ आणि कोणत्याही भाषेत घेतलेले शिक्षण याला जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. जीवन सफल होण्यासाठी या तीनही बाबी मोलाच्या ठरतात. जीवनात जगण्याचा आनंद द्विगुणीत करतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध नाटककार, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी वसईत केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पालघर जिल्हा मंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कवी नंदन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. यावेळी ते म्हणाले की, प्रबळ इच्छाशक्ती होती म्हणून कोकणातून मुंबईत शिक्षण घ्यायला आलो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुंबईत राहिलो, नोकरी केली आणि १९६२-६३ दरम्यान जे डोक्यात होते ते नाटक पुन्हा नव्याने डोक्यात घोळू लागले. गावाकडे नाटक बसवताना अनंत अडचर्णी येतात. जड अंतकरणाने गावात बोर्ड लिहावा लागतो, आज नाटक व्हवूचा नाय. त्याच अनुभवातून वस्त्रहरण या नाटकाचा जन्म झाला. त्या नाटकाने मला, मराठी रंगभूमीला मोठा लौकीक मिळवून दिला. एका मालवणी नाटकाने साता समुद्रापलिकडे झेप घेतली. लेखक या नात्याने मला अनेक पुरस्कार मिळवून दिले. हा सगळा प्रवास त्यांच्या आयुष्याचा असला तरी त्यांनी तो एका तासात अतिशय मनमोकळेपणाने व त्यांच्या विनोदी शैलीत असा काही मांडला की उपस्थित एक तास खळखळून हसत, उत्स्फूर्त दाद देत, असत असेही गवाणकर यांनी यावेळी बोलताना सांगिलते. (प्रतिनिधी)

Web Title: Art, sports and education are important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.