आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडविल्या

By admin | Published: July 2, 2017 05:40 AM2017-07-02T05:40:02+5:302017-07-02T05:40:02+5:30

आश्रमशाळा शिक्षक, अधिक्षक, मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भातील आदेश अप्पर आयुक्त, ठाणे यांनी देऊनही त्याची

Ashramshalas shifted the employees' transfers | आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडविल्या

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडविल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मोखाडा : आश्रमशाळा शिक्षक, अधिक्षक, मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भातील आदेश अप्पर आयुक्त, ठाणे यांनी देऊनही त्याची अंमलबजावणी जव्हार प्रकल्प अधिकाऱ्यांनी न केल्याने तब्बल ७५ कर्मचाऱ्यांची कुचंबणा सुरु आहे. त्याबाबत आदिवासी प्रकल्प शिक्षक कर्मचारी संघटनेने विचारणा करुनही कोणतेही उत्तर
दिले जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
जव्हार प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्र मगड व वाडा या चार तालुक्यातील ३० आश्रमशाळांचा समावेश आहे. याबाबत संघटनेने २९ जून रोजी विविध मागण्याचे निवेदन जव्हार प्रकल्प कार्यालयाला दिले होते. बदलेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण व प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु असतांना शिक्षकांच्या बदल्या वेळेत न झाल्यास शालेय नियोजन कोलमडून त्याचा दूरगामी परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होणार असल्याचे सुभाष भांगरे यांनी सांगितले.
त्याचबरोबर बदलीच्या नंतर शिक्षकांना रहायची व्यवस्था करणे त्यांच्या मुलांचा शैक्षणिक प्रवेश या बाबी वेळेवर करताना शिक्षकांना अडचणी निर्माण होणार आहेत. यामुळे तात्काळ मार्ग न निघाल्यास शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. याबाबत अनेकदा जव्हार प्रकल्प अधिकारी पवनीत कौर यांच्याशी प्रत्यक्ष दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही.

भरती करून शिक्षकांवरील अतिरिक्त भार काढा

आदिवासी आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी संघटनेने केलेल्या मागण्यांत आश्रमशाळांची वेळ ११ ते ५ करा, प्राथमिक मुख्याधापकपद पुर्नजिवीत करण्यात यावे, नियातकालिन बदल्याबाबत कार्यवाही व्हावी, शिक्षकांवरील अतिरिक्त भार काढण्यासाठी रिक्त पदे भरावीत, कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वेतन निश्चित करावे, उच्च माध्यमिक शिक्षकांची जुलै २०१६ पासून रोखलेली वेतनवाढ त्वरीत देण्यात यावी याचा समावेश आहे.

आंदोलनाचा इशारा
वरिष्ठ कार्यालय एसीटी ठाणे येथून आलेल्या शिक्षक बदली आदेशांची अंमलबजावणी करून कर्मचाऱ्यांना दिलासा देणे ही प्रकल्प कार्यालयाची नैतिक जबाबदारी होती, परंतु १ महिना झाल्यानंतरही त्याबाबत कोणतीच हालचाल होत नसल्याने आदिवासी प्रकल्प शिक्षक कर्मचारी संघटना आंदोलन करणार असल्याचे अध्यक्ष सुरेश भांगरे यांनी लोकमतला दिली.

Web Title: Ashramshalas shifted the employees' transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.