विधानसभा मतदारसंघाचे बालेकिल्ले शाबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:04 AM2018-06-01T00:04:20+5:302018-06-01T00:04:20+5:30

या लोकसभा मतदार संघात विधानसभा निहाय झालेली मतदानाची आकडेवारी पाहता सर्वच पक्षांनी आपापले बालेकिल्ले शाबूत ठेवल्याचे सिद्ध झाले आहे.

The Assembly Constituency | विधानसभा मतदारसंघाचे बालेकिल्ले शाबूत

विधानसभा मतदारसंघाचे बालेकिल्ले शाबूत

Next

पालघर : या लोकसभा मतदार संघात विधानसभा निहाय झालेली मतदानाची आकडेवारी पाहता सर्वच पक्षांनी आपापले बालेकिल्ले शाबूत ठेवल्याचे सिद्ध झाले आहे.
डहाणू विधानसभा मतदार संघातून भाजपाचे पास्कल धनारे हे आमदार आहेत. येथून राजेंद्र गावीत यांना ४९ हजार १८१, किरण गहला यांना ४२ हजार ५१७, श्रीनिवास वनगा यांना ३८ हजार ७७८, दामू शिंगडा यांना ५ हजार ९५५, बळीराम जाधव यांना ५ हजार ४८४, शंकर भदादे यांना १ हजार ६ तर संदीप जाधव यांना १ हजार ७२९ मते मिळाली असून ४ हजार ४४६१ मतदारांनी नोटा (यापैकी कोणालाही नाही) मतदान केले.असे मिळून डहाणू विधानसभा मतदार संघात १ लाख ४९ हजार २११मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले.
विक्र मगड विधानसभा
विक्रमगड विधानसभा मतदार संघातून भाजपाचे विष्णू सवरा हे आमदार आहेत. येथून राजेंद्र गावीत यांना ५६ हजार ५१८, श्रीनिवास वनगा यांना ५१ हजार १६४, किरण गहला यांना १६ हजार १०९, बळीराम जाधव यांना १३ हजार २९७, दामू शिंगडा १२ हजार ७४७, संदीप जाधव यांना १ हजार ९१८, शंकर भदादे १ हजार ५०१ मते मिळाली असून ४ हजार ५३ मतदारांनी नोटा ला मतदान केले.असे मिळून विक्र मगड विधानसभा मतदार संघात १ लाख ५७ हजार ३०७ मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले
पालघर विधानसभा
पालघर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे अमित घोडा हे आमदार आहेत. त्या मतदारसंघातून राजेंद्र गावीत यांना ५६ हजार २१३, श्रीनिवास वनगा यांना ५४ हजार ४५३, बळीराम जाधव यांना १३ हजार ६९०, दामू शिंगडा यांना ८ हजार ७३६ किरण गहला यांना ६ हजार ५९१, संदीप जाधव यांना १ हजार ३३७, शंकर भदादे यांना ८०९ मते मिळाली असून ३ हजार ७४ मतदारांनी नोटाला (यापैकी कोणालाही नाही) मतदान केले. असे मिळून पालघर विधानसभा मतदार संघात १ लाख ४४ हजार ९०५ मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले.
बोईसर विधानसभा
बोईसर विधानसभा मतदार संघात बविआचे विलास तरे हे आमदार आहेत. येथून श्रीनिवास वनगा यांना ४९ हजार ९९१, बळीराम जाधव यांना ४ हजार ७५४, राजेंद्र गावीत यांना ४१ हजार ६३२, किरण गहला यांना ४ हजार ९६०, दामू शिंगडा यांना ४ हजार ३७४, संदीप जाधव यांना १ हजार ७२ तर शंकर भदादे यांना ८१४ मते मिळाली असून २ हजार २२६ मतदारांनी नोटाला (यापैकी कोणालाही नाही) मतदान केले, असे मिळून बोईसर विधानसभा मतदार संघात १ लाख ५१ हजार ८२३ मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले.
नालासोपारा विधानसभा
नालासोपारा विधानसभा मतदार संघात बविआचे क्षितिज ठाकूर हे आमदार आहेत. येथून बळीराम जाधव यांना ७९ हजार १३४, राजेंद्र गावीत यांना ३७ हजार ६२३, श्रीनिवास वनगा यांना २७ हजार २६५, दामू शिंगडा यांना ३ हजार ६६२, किरण गहला यांना ७८६, शंकर भदादे यांना ३०६ तर संदीप जाधव यांना २७४ मते मिळाली असून १ हजार ४०६ मतदारांनी नोटाला (यापैकी कोणालाही नाही) मतदान केले, असे मिळून नालासोपारा विधानसभा मतदार संघात १ लाख ५० हजार ४५६मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले.
वसई विधानसभा
वसई विधानसभा मतदारसंघात बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे आमदार आहेत. तेथून बळीराम जाधव यांना ६४ हजार ४७८, राजेंद्र गावीत यांना ३१ हजार ६११, श्रीनिवास
वनगा यांना २१ हजार ५५५, दामू शिंगडा यांना १२ हजार २३९, किरण गहला यांना ९२४, शंकर भदादे यांना ३४८ तर संदीप जाधव यांना ३३९ मते मिळाली असून १ हजार ६६४ मतदारांनी नोटाला (यापैकी कोणालाही नाही) मतदान केले. असे मिळून वसई विधानसभा मतदार संघात १ लाख ३३ हजार १५८ मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले.
वरील आकडेवारी पाहता बोईसर विधानसभा मतदार संघात बविआच्या उमेदवारापेक्षा शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा व भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पडलेली अधिक मते वगळता जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून पक्षिय बलाबल पूर्वी सारखेच राहिले आहे.
 

Web Title: The Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.