जळालेल्या वाहनामुळे सहायक वनसंरक्षक, क्षेत्रपाल अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 06:32 AM2018-04-02T06:32:24+5:302018-04-02T06:32:24+5:30

जळाऊ लाकडांचे भारे वाहणारे वाहन जव्हार वनविभागाच्या कस्टडीत असताना अचानक जळून खाक झाल्याने जव्हार येथील तत्कालीन सहायक वनसंरक्षक एस.व्ही. राजवाडे व वनक्षेत्रपाल डी.व्ही. ठाकूर अडचणीत आले आहेत.

Assistant Engineer, Regional Trouble due to the Burned Vehicle | जळालेल्या वाहनामुळे सहायक वनसंरक्षक, क्षेत्रपाल अडचणीत

जळालेल्या वाहनामुळे सहायक वनसंरक्षक, क्षेत्रपाल अडचणीत

Next

- अजय महाडीक
मुंबई - जळाऊ लाकडांचे भारे वाहणारे वाहन जव्हार वनविभागाच्या कस्टडीत असताना अचानक जळून खाक झाल्याने जव्हार येथील तत्कालीन सहायक वनसंरक्षक एस.व्ही. राजवाडे व वनक्षेत्रपाल डी.व्ही. ठाकूर अडचणीत आले आहेत. मार्च २०१६ तील हे प्रकरण दंडआकारणीने मिटवण्याचे अधिकार असतानादेखील तब्बल आठ महिने टाइमपास करणे, त्यांच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी आदिवासी असणारे वाहनाचे मालक काशिराम रामजी कोकाटे यांनी वनअधिकाऱ्यांनी संगनमत करून ते जाळल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, जव्हार वनविभागाचे उपवनसंरक्षक यांनी राजवाडे यांच्यावर प्रकरण निष्काळजीपणे हाताळल्याचा ठपका ठेवला आहे.
येथील दुर्गम आदिवासी वस्तीमध्ये पावसाळ्याअगोदरची बेगमी करताना इतर जिन्नसांबरोबरच इंधनासाठी जळाऊ लाकूडफाटा एकत्र केला जातो. त्यानुसार, वरसाळे येथील बुधा रामा हिरवा यांच्या परसातील सुक्या लाकडांचे तीन भारे घेऊन कोकाटे आपल्या बोलेरो गाडीने चालले असताना नंदनमाळ येथे त्यांच्यावर वनविभागाने कारवाई केली. मात्र, याप्रकरणी गाडी पकडली असली, तरी कुणासही अटक करण्यात आली नाही की, कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली नाही. वास्तविक, कोकाटे कुटुंबीयांनी ते वाहन आपल्या बेरोजगार मुलाला रोजगार मिळावा म्हणून बॅँकेतून कर्जाऊ घेतले होते. अद्याप त्या कर्जाचे ३६ हप्ते फेडणे शिल्लक असल्याने बॅँकेनेही तगादा लावला आहे. दरम्यान, वनविभागाने आठ महिने वाहन कस्टडीत ठेवल्याने बेरोजगार झालेल्या कोकाटेंना इन्शुरन्सही भरता आला नाही. त्यामुळे रिलायन्स फायनान्सने जळून गेलेल्या वाहनाची भरपाई देण्यास नकार दिला आहे.
पकडलेल्या सरपनाची किं मत अवघी दीडशे रुपये असल्याचा उल्लेख घटनास्थळी झालेल्या पंचनाम्यामध्ये असून नंतर कागद रंगवताना ती दोन हजार २० रुपये एवढी वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यापूर्वी शिसव वनोपजाची मुद्देमालासह पकडलेली वाहने दंडात्मक कारवाई करून मुक्त करण्यात आली आहेत.
याप्रकरणी वाहनमुक्त करण्याचे आश्वासन देऊन राजवाडे यांनी लाच घेतल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री, पालकमंत्री व महसूल व वनविभागाच्या सचिवांकडे निवेदनाद्वारे दाद मागण्यात आली असून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर वरिष्ठांचे ताशेरे

मुख्य वनसंरक्षक ठाणे यांच्या दालनामध्ये झालेल्या वनसंरक्षक व जप्त वाहनासंबंधी मासिक सभेला राजवाडे गैरहजर राहिल्याबद्दल तसेच सदर वाहने सरकारजमा करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याबाबत त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
सावा, उत्तर जव्हार या वनक्षेत्रात गुन्हे दाखल करून पकडलेली तब्बल आठ वाहने बराच काळ कस्टडीत ठेवून निर्णय न घेतल्याने त्यांची प्रत खराब होऊन जप्त मालाचा दर्जाही घसरल्याने महाराष्टÑ नागरी सेवा वर्तणूक १९७९ प्रमाणे कर्तव्यतत्परता न दाखवणे व अत्यंत निष्काळजीपणे प्रकरणे हाताळणे तसेच वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली केल्याचा ठपका उपवनसंरक्षकांनी ठेवला आहे.

जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याबाबत राजवाडे यांच्याकडून खुलासा मागण्यात आला आहे. तो न केलास एकतर्फी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
एस.व्ही. राजवाडे यांनी जळालेल्या महिंद्रा बोलेरोप्रकरणी अहवाल सादर न केल्यास ते महाराष्टÑ नागरी सेवा नियम १९७९ अन्वये कारवाईस पात्र ठरतात, तसेच प्राधिकृत अधिकारी म्हणून त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे दिसून येत आहे, असा अभिप्राय उपवनसंरक्षक डॉ. सिवबाला एस. (भा.व.से) यांनी नोंदवला आहे.

प्राधिकृत अधिकारी असल्याने गंभीर नसलेल्या प्रकरणामध्ये न्यायबुद्धीने दंडआकारणी करून ती वाहने सोडण्याचे अधिकार मला होते. मात्र, पूर्वी तशी वाहने सोडल्याने वरिष्ठांकडून माझ्यावर कारवाई झाली होती. त्यामुळे काशिराम कोकाटे यांच्या प्रकरणामध्ये जैसे थे भूमिका घेतली.
- एस.व्ही. राजवाडे, सहायक वनसंरक्षक

Web Title: Assistant Engineer, Regional Trouble due to the Burned Vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.