भाईंदरच्या डोंगरी येथे रस्ता खचल्याने भितीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 08:54 PM2019-07-25T20:54:54+5:302019-07-25T20:56:45+5:30

भिंत कोसळल्याने येथील तलावा लगतचा रस्ता खचण्याच्या स्थितीत आहे.

An atmosphere of horror due to road damaged of Bhayander | भाईंदरच्या डोंगरी येथे रस्ता खचल्याने भितीचे वातावरण

भाईंदरच्या डोंगरी येथे रस्ता खचल्याने भितीचे वातावरण

googlenewsNext
ठळक मुद्देभाईंदर पश्चिमेस ये - जा करण्यासाठी उत्तन, पाली, चौक, गोराई, मनोरी साठी सदरचा एकमेव रस्ता आहे.सद्या खचलेल्या रस्त्याच्या कडेला ग्रामस्थांनीच दगडं ठेऊन अपघात घडु नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मीरारोड - भाईंदरच्या डोंगरी येथे रस्ता खचल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपर्वी याच भागात रस्त्या लगतच्या तलावाची कुंपण भिंत कोसळली होती.

भाईंदर पश्चिमेस ये - जा करण्यासाठी उत्तन, पाली, चौक, गोराई, मनोरी साठी सदरचा एकमेव रस्ता आहे. शिवाय एस्सेलवर्ल्ड, ज्युडिशीयल अकदामी, केशवसृष्टी साठी सुध्दा वाहनाने जाण्यास हाच रस्ता आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ असली तरी डोंगरी ते आनंद नगरपर्यंत रस्ता तसा अरुंदच आहे. येथून कचरा वाहुन नेणारे डंपर, परिवहन सेवेच्या बस , डंपर आदी अवजड वाहने देखील भरधाव जात असतात. यंदाचा पावसाळा सुरु झाला तेव्हा आनंद नगर येथील रस्त्या लगत असलेल्या तलावाची कुंपण भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने येथील तलावा लगतचा रस्ता खचण्याच्या स्थितीत आहे.

त्यातच आज गुरुवारी सदर तलावा पासुन जवळच असलेल्या विहरी लगतचा रस्ता खचला आहे. रस्त्याचा काही भाग खचुन पडला असुन उर्वरीत काही भागास लांब भेग पडली आहे. रस्ता खचल्याचे कळताच स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पालिकेच्या बांधकाम विभागास याची माहिती देऊन सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सद्या खचलेल्या रस्त्याच्या कडेला ग्रामस्थांनीच दगडं ठेऊन अपघात घडु नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. सदर रस्त्याच्या उजव्या बाजुस खोल भागात शेती असुन त्यामुळे डावी कडील डोंगरावरुन येणाराया पाण्याच्या प्रवाहाने खालची माती वाहुन जात असल्याने रस्ता खचल्याचे सांगण्यात आले.

Web Title: An atmosphere of horror due to road damaged of Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.