नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:23 AM2020-10-09T00:23:15+5:302020-10-09T00:23:25+5:30

गुंगीचे औषध दिले; नालासोपाऱ्यातील घटना

Atrocities on women by showing job lure | नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

Next

नालासोपारा : विरारला राहणाºया ३८ वर्षीय महिलेला परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तिच्याकडून पैसे घेऊन तिला शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेने नालासोपारा पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दिल्यावर पोलिसांनी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यापैकी पाच आरोपींना मुंबईच्या कुर्ला येथून अटक केली आहे. दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

विरारला राहणाºया ३८ वर्षीय पीडित महिलेची आॅक्टोबर २०१९ ते मे २०२० यादरम्यान नालासोपारा पश्चिमेकडील एका इमारतीमध्ये आरोपी रुक्साना सलीम सिद्दिकी (६०) यांच्यासोबत ओळख झाली होती. त्यांनी त्यांचे पती आरोपी सलीम सिद्दिकी (६५) हे परदेशात नोकरीस पाठवतात, असे आमिष दाखवून पीडित महिलेकडून २ लाख रुपये घेतले. नंतर तिला शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून दिल्याने ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तीन आरोपींनी तिचे नग्न अवस्थेत फोटो काढून ती शुद्धीवर आल्यावर तिच्या घरी पाठवून दिले. तिन्ही आरोपींनी त्यांच्या घरात एकटे असताना पीडित महिलेला बोलावून तिचे अश्लिल फोटो वायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले.

१० दिवसांत परदेशात नोकरीची व्यवस्था होईल असे सांगून दुसºया दोन आरोपींसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असे पीडितेस सांगण्यात आले. पण पीडित महिलेने यास नकार दिला. तरी तिच्यावर अत्याचार होत राहिले. शेवटी कंटाळून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी आरोपी सलीम सिद्दिकी (६५), अखिल सलीम सिद्दिकी (३२), फिरोज सलीम सिद्दिकी (२५), विजय बलराम फतीयाल (३०), वेनम (२५), रु क्साना सलीम सिद्दिकी (६०) आणि फरिन सलीम सिद्दिकी (२५) या सात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

घटनेची तक्र ार आल्यावर सात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एलसीबी, नालासोपारा आणि तुळिंज या पोलिसांच्या तीन टीम बनवून एकाच परिवारातील दोन महिला आणि तीन पुरुष अशा पाच आरोपींना बुधवारी मुंबईच्या कुर्ला येथून अटक केली आहे.
- वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा
पोलीस ठाणे

Web Title: Atrocities on women by showing job lure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.