निलेश सांबरे यांच्या वाहनावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:24 AM2018-05-29T00:24:58+5:302018-05-29T00:24:58+5:30
विक्रमगड येथील कोकण विकास मंच चे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वाहनावर काही अज्ञात इसमानी गोळीबार केला.
पालघर : विक्रमगड येथील कोकण विकास मंच चे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वाहनावर काही अज्ञात इसमानी गोळीबार केला. या प्रकरणी विक्र मगड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी कारवाई बाबत पोलीसा कडून गांभीर्य दाखवले जात नसल्याच्या निषेधार्थ हजारो कार्यर्क्त्यांनी पोलीस स्टेशन ला घेराव घातला.
निलेश सांबरे यांनी सामाजिक कार्याबरोबर राजकीय क्षेत्रात पदार्पण करून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्यांचा विक्र मगड, वाडा विधानसभा क्षेत्रात मतदारांशी असलेल्या मोठ्या जनसंपर्कामुळे भाजपाला मोठे मतदान होणार असल्याची चिन्हे होती. त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा निर्माण झाला होता.अशा वेळी काही अज्ञात इसमांकडून त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याप्रमाणे २७ मे रोजी रात्री ९ वाजून ७ मी.च्या दरम्यान झडपोली येथील त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर काही अज्ञात गाव गुंडांकडून हैदोस घालण्याचा प्रकार घडला. ह्या प्रकाराची माहिती पोलीस अधीक्षक मंजुनाथ शिंगे व विक्र मगड चे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना तात्काळ सांगून ही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे सांबरे ह्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्ह्या बाहेरून आलेल्या काही गुंडांनी निवडणुकीच्या दिवशी पूर्ण विक्र मगड तालुक्यातील मतदान केंद्रांच्या प्रतिबंधित भागात शिरकाव करून मतदारांना प्रलोभने दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावेळी सांबरे ह्यांचे मेहुणे कल्पेश पडवले यांना दमदाटी करण्यात आली. पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हल्लेखोर आपल्या गाड्यासह पळून गेलेत.