आदिवासी निधीवर दरोडाच, आयआयटी मुंबईचा लेखापरीक्षण अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 02:44 AM2018-09-12T02:44:55+5:302018-09-12T02:44:57+5:30
विक्रमगड तालुक्यातील ३०४ कामांपैकी फक्त ४२ कामे झालेली आहेत.
- राहुल वाडेकर
तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील ३०४ कामांपैकी फक्त ४२ कामे झालेली आहेत. या कामांवर ३० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे, याबाबत लोकमतने पाठपुरावा केला होता. पत्रकार सघांकडून व लोकमतच्या मागणी वरून आयआयटी कडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल या संस्थेने आदिवासी विभागाकडे वेळोवेळी सादर केलेले चार अहवाल पत्रकारांसमोर सादर केले. यामध्ये ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत २०१२-१३ ते २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या कामामध्ये मोठा गैरव्यावहार झाल्याचे आयआयटी, मुंबईच्या लेखा परीक्षण अहवालात सिद्ध झाले आहे.
विक्रमगड तालुक्यांतील गावांचा विकास व्हावा, यासाठी ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेमधून २०१२-१३ ते २०१४-१५ या वर्षामध्ये ९४ गावांपैकी ८३ गावामध्ये ३०४ विकास कामे मंजूर करण्यात आली. त्यासाठी आदिवासी विकास विभागाने ३० कोटींचा निधी दिला गेला. मात्र गावांचा विकास न होता तालुक्यातील अधिकारी व ठेकेदार यांचाच विकास झाला. तब्बल २६ कोटी रु पये त्यांनी संगनमताने हडप केले आहेत असा आरोप करण्यात आला आहे.
आयआयटीच्या एकूण ११७५ पानांच्या अहवालामध्ये प्रत्येक कामांची तांत्रिक, संख्यात्मक व गुणात्मक निकषांवर तपासणी झाली आहे. या अहवालामध्ये काही धक्कादायक निष्कर्ष नोंदवले गेले आहेत. त्यामध्ये एकूण ३०४ कामांपैकी एक ही काम प्रत्यक्षात सुरूच झाले नाही. १०८ कामे प्रत्यक्षात साईटवर मिळाली नाहीत. ५७ कामांची अंदाजपत्रकेच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे नसल्याने ती कामे झाली आहेत किंवा नाही हेच तपासले जाऊ शकले नाही. प्रत्यक्षात ती कामे अस्तित्वात आहेत की, नाहीत याचीच शंका आहे. ९४ कामांचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट आहे. कामे करायची म्हणून केली आहेत. तर फक्त ४२ कामे ही चांगल्या स्थितीमध्ये होती. मात्र त्यांची अंदाजपत्रके मिळाली असती आणि त्या प्रमाणेच ती झाले असेल तरच ती चांगली असे म्हणता येतील, असे अहवालामध्ये म्हटले आहे.
याचाच अर्थ एकूण ३०४ कामांपैकी फक्त ४२ कामेच झालेली आहेत. आयआयटीच्या अहवालानुसार फक्त १३.८१ टक्के कामे झालेली आहेत. संबंधित वृत्त/ २
>२६ कोटींचा भ्रष्टाचार ११७५ पानी अहवाल
एकूण कामांवर सुमारे ३० कोटी रु पये खर्च झाला आहे. म्हणजेच एकूण २६ कोटी रुपयांच्या आसपास भ्रष्टाचार झाला आहे. हे स्पष्ट होत आहे. या एकूण कामांमध्ये ४५ टक्के डांबरीकरण रस्ते, १३ टक्के मोऱ्या, १२ टक्के सिमेंट काँक्र ीट रस्ते, ३० टक्के गटार, संरक्षक भिंती, व्यायामशाळा, समाजगृह, शौचालय व खेळाची मैदाने यांचा समावेश आहे. मात्र या कामांचा आदिवासी बांधवाना उपयोग झालेला नाही. आयआयटीने ११७५ पानी अहवालामध्ये निरीक्षणे नोंदवली आहेत.
पहिल्या टप्पा मध्ये आमच्या कडे १०५ कामाचा अहवाल मिळाला आहे. दुसºया आणि तिसºया टप्पाचा अहवालाची चौकशी सुरु आहे. १०५ कामा पैकी १२ कामे जि.प पाणी पुरवठा विभागाची आहेत. ३ कामे जि.प च्या सां.बा ची आहेत. ९० कामे सां.बा ची आहेत. जि. प च्या ११५ कामा संदर्भात खुलासा सादर केला आहे. - अजित कुंभार, प्रकल्प अधिकारी