मुंबई-अहमदाबाद हायवेवर अवतरले यमदूत

By admin | Published: January 21, 2016 02:27 AM2016-01-21T02:27:54+5:302016-01-21T02:27:54+5:30

हाय वेवर विनाहेल्मेट बाइक चालवणाऱ्यांना चक्क यमदूत हेल्मेटची भेट असल्याचे अनोखे चित्र सध्या मुंबई-अहमदाबाद हाय वेवर बघायला मिळत आहेत

Avatarla Jummoot on the Ahmedabad-Ahmedabad highway | मुंबई-अहमदाबाद हायवेवर अवतरले यमदूत

मुंबई-अहमदाबाद हायवेवर अवतरले यमदूत

Next

वसई : हाय वेवर विनाहेल्मेट बाइक चालवणाऱ्यांना चक्क यमदूत हेल्मेटची भेट असल्याचे अनोखे चित्र सध्या मुंबई-अहमदाबाद हाय वेवर बघायला मिळत आहेत. तसेच काही मुले पथनाट्याव्दारे तर पोलीस स्टिकर आणि इतर साहित्य वाटून वाहनचालकांना रस्ता सुरक्षेचे नियम पटवून देताना दिसतात.
चिंचोटी महामार्ग पोलिसांनी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने चिंचोटी येथे वाहनचालकांचे प्रबोधन आणि बाइकस्वारांना विनाहेल्मेटने गाडी चालवण्याबद्दल जनजागृती मोहीम हाती घेतली. विनाहेल्मेट बाइकस्वारांना यमदूत अडवून त्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगतो. त्यानंतर, बाइकस्वाराला मोफत हेल्मेट दिले जाते. १० जानेवारीपासून सुरू झालेल्या अभियानाद्वारे ५०० बाइकर्सना हेल्मेटचे वाटप करून सुरक्षेचे धडे दिले. पोलिसांनाही रिफ्लेक्टर जॅकेट देण्यात आले.
महामार्ग पोलीस मदत केंद्र चिंचोटी येथे झालेल्या या कार्यक्रमाला वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, पोलीस निरीक्षक सी.जी. सावंत महामार्ग पोलीस अधीक्षक समाधान पवार, चिंचोटीचे प्रभारी अधिकारी आनंद भोईर, उपनिरीक्षक ए.डी. यादव आणि वोक्हार्टचे केंद्रप्रमुख रवी हिरवाणी आदी मान्यवर उपस्थित होते. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांचे प्राण कसे वाचवता येतील, यावर वोक्हार्टच्या अतिदक्षता विभागाचे डॉ. शरद यादव यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जोपर्यंत दुचाकीस्वाराला स्वत:चा जीव वाचवण्यासाठी हेल्मेटचे महत्त्व समजणार नाही, तोपर्यंत अपघातात दुचाकीस्वारांचे नाहक बळी जाण्याचे प्रमाण कमी होणार नाही. भारतातील वाहन उद्योगाचा विस्तार लक्षात घेता आता वाहन अथवा रस्ता सुरक्षिततेचे प्रशिक्षण शाळा व महाविद्यालयांतूनच दिले गेले पाहिजे, असे मत हितेंद्र ठाकूर यांनी या वेळी मांडले. (प्रतिनिधी)

Web Title: Avatarla Jummoot on the Ahmedabad-Ahmedabad highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.