विक्रमगडमध्ये अवतरले अमेरिकन विद्यार्थी , ओंदे येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांसह विविध खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 06:01 AM2017-10-19T06:01:21+5:302017-10-19T06:01:39+5:30
काही विद्यार्थी आपल्या विद्यार्थीदशेत असलेल्या गोष्टी जपून ठेवतात. अशीच एक गोष्ट मंगळवारी तालुक्यातील ओंदे येथील जिल्हा परिषद शाळेत घडली.
- राहुल वाडेकर
विक्रमगड : काही विद्यार्थी आपल्या विद्यार्थीदशेत असलेल्या गोष्टी जपून ठेवतात. अशीच एक गोष्ट मंगळवारी तालुक्यातील ओंदे येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. येथील आदिवासी समाजातील लहानग्या विद्यार्थ्यांना चक्क परदेशी विद्यार्थ्यांबरोबर खेळ खेळता आले. आणि हे खेळत असतांना त्यांचा उस्ताह द्विगुण झाला होता.
तालुक्यातील जिल्हा परीषद केंद्र शाळा ओंदे या मराठी शाळेतील आदिवासी विद्यार्थांसोबत अमेरिकन स्कूल आॅफ चेन्नई या अमेरिकन शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठ मोळा खेळ असलेल्या दोरी उडी व विविध प्रकारचा क्र ीडा स्पर्धेचे आयोजन करून आनंद लुटला. या वेळी ओंदे जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी एक सुरातील निसर्गावरील गाण्यांचे सादरीकरण अमेरीकन विद्यार्थ्यांपुढे सादर केले. या वर अमेरिकेतील विद्यार्थी मंत्रमुग्ध होताना पहावयास मिळाले.
अमेरिकेत स्थित असलेली शाळा अमेरिकन स्कूल आॅफ चेन्नई या शालेतील विद्यार्थी भारतीय ग्रामीण भागाची संस्कृती याचा अभ्यास करण्यासाठी विक्र मगड तालुक्यात आले आहेत. या वेळी त्यानी ओंदे येथील विद्यार्थ्यां सोबत विविध मराठमोळ्या क्र ीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. या वेळी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत रममान होत त्यांच्या बरोबर स्पर्धा घेतल्या. अमेरिकेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर, त्यांच्यातील शिस्त, मोकळेपना याची चुणूक या वेळी बघावयास मिळाली.
या वेळी पालक मंडळी सुद्धामोठ्या संख्येने जमली होती. ती आपल्याला मुलांना क्र ीडा स्पर्धात प्रोत्साहन देत होती. या वेळी अमेरिकेतील विद्यार्थ्यांन कडून आत्मविश्वास, शिस्त, मोकळेपणा, धाडस, सातत्य अशा अनेक गोष्टी आपल्या मुलांना शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी अमेरिकन स्कूल आॅफ चेन्नई मार्फत अडव्हेंचर इन्सपेक्टर अमोल देशपांडे सर, विशाल सत्पाल, जिल्हा परीषद केंद्र शाळा ओंदेचा मुख्याध्यापिका अरुंधती राऊत, शाळेचे शिक्षक वर्ग उपस्थित होते.