बहुजन विकास आघाडीचा 'महाविकास' आघाडीला पाठिंबा, 'सिल्व्हर ओक'वर भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 07:12 PM2019-11-27T19:12:08+5:302019-11-27T21:11:42+5:30
त्यानंतर लागलीच आमदार ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार याची "सिल्वर ओक"
आशिष राणे
वसई - आमदारहितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस प्रणित महाविकासआघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेत विशेष म्हणजे बविआचे तिन्ही आमदार महाविकास आघाडी सोबत उस्फुर्त पणे सत्तेत सहभागी होतील,अशी माहिती हितेंद्र ठाकूर यांनी लोकमत ला दिली. आज बुधवारी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र राज्याच्या विधानभवनात बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांनी आपली हजेरी लावली आणि विधिपूर्वक शपथ ग्रहण केली,यावेळी वसई विधानसभेचे आम. हितेंद्र ठाकूर तसेच त्यांचे नालासोपाऱ्याचे आम.क्षितीज ठाकूर आणि बोईसर चे आम. राजेश पाटील या तिघांनी शपथ घेतली. त्यानंतर बहुजन विकास आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष आम. हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या तिन्ही आमदारांचा नव्या महाआघाडीच्या सरकारला पाठिंबा देत असल्याचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आम. अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केल्यावर आम.चव्हाण यांनी तसं ट्विटर वरून जाहीरही केलं.
त्यानंतर लागलीच आमदार ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार याची "सिल्वर ओक" या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आणि तिथे ही माझ्या बहुजन विकास आघाडी पक्षाचा पाठिंबा महाविकास आघाडी सरकारला असल्याचे लेखी पत्र ही स्वाधीन करीत पवार यांच्याशी चर्चा केली,त्यावेळी पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल तसेच खासदार सुप्रिया सुळे या ही उपस्थित होत्या, दरम्यान बहुजन विकास आघाडी पक्ष या नव्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उस्फुर्त पणे सहभागी झाल्याची माहिती ही लागलीचआम. हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित माध्यमांना ही दिली. विशेष म्हणजे,या अगोदर महिना भर सुरू असलेला सत्तेच्या राजकीय खलबतावर बारीक लक्ष देत नेमकं काय चाललंय यावर आम. हितेंद्र ठाकूर यांचे बारीक लक्ष होते, मात्र अपक्ष तथा छोटे पक्ष किंबहुना आम ठाकूर हे नेहमीच राज्यात ज्याची सत्ता त्याला पाठिंबा देत आले आहेत,त्यामुळे मधल्या काळात राज्यात भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपद आणि समान वाटा या मुद्द्यांवरून संघर्ष सुरू असताना बहुजन विकास आघाडीने महाआघाडी म्हणजे काँग्रेसचा हात सोडून भाजपला साथ दिली होती. व भाजपची जरी सत्ता आली असती तरी त्यांनी भाजप सरकारलाच पाठिंबा दर्शवला असता,मात्र आता नव्या महाविकास आघाडी ला बहुजन विकास आघाडी ने पाठिंबा दिला आहे त्यात तसं काही नवल नाही.
बिनशर्त पाठिंबा म्हणजेच तिन्ही मतदारसंघात विकासाला प्राधान्य द्यावे
....आमदार, हितेंद्र ठाकुरांची हीच मनीषा
आमदार ठाकूर यांनी मागील तीन दशकं जरी वसई व पालघर जिल्ह्यात सत्ता उपभोगली असली तरी मात्र राज्यात सरकार कुठलेही येऊ दे ।। माझा पाठिंबा म्हणजे त्याच्या बदल्यात मला माझ्या मतदारसंघात विकासासाठी प्राधान्य दयावे हीच मनीषा ठेवत आजवर आम. ठाकुर यांनी समाजकारण केलं आहे,आणि म्हणूनच इथं बविआ ची एकहाती सत्ता आजवर आरूढ होऊन वसईचा विकास व कायापालट झाला आहे.