बहुजन विकास आघाडीला करावे लागणार मंथन, कारणांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:50 AM2019-05-27T00:50:04+5:302019-05-27T00:50:06+5:30
वसई ग्रामीण भागात या लोकसभा निवडणुकीत अनेक गावात युतीच्या बाजूने मतदान झाल्याने या भागात युतीची ताकत वाढली
पारोळ : वसई ग्रामीण भागात या लोकसभा निवडणुकीत अनेक गावात युतीच्या बाजूने मतदान झाल्याने या भागात युतीची ताकत वाढली असून बहूजन विकास आघाडी चा हा मतदार युती च्या बाजूने उभा राहिल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आघाडीला मोठी ताकद लावावी आहे.
पूर्व भाग हा बोईसर विधानसभा मतदार संघात येतो या मतदार संघात बहुजन विकास आघाडी चा आमदार आहे. या त्यांच्या विजयात या भागातील मते निर्णायक ठरली आहेत. तर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, ही आघाडीचे असताना या लोकसभा निवडणुकीत खानिवडे, शिरसाड, चांदीप, पारोळ, देपिवली, करजोण, मेढे, वडघर, मांडवी, टोकरे, तिल्हेर, नवसई इ. गावांमध्ये या लोकसभा निवडणुकीत युती ला जास्त मते मिळाली इतर गावात ही युतीची टक्केवारी वाढली या भागात शिवसेना, श्रमजीवी संघटना, भाजपा यांनी ताकत लावली असली तरी मोदी लाटेमुळे ही युती ला तरुण वर्गाने मतदान केल्याचे राजकीय जाणकाराचे मत आहे.
बोईसर मतदार संघात येणारा वसई पूर्व भाग हा बहुजन विकास आघाडी चा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खासदार, पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य याचा मान या भागातील नागरिकांना मिळाला आहे.
>युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
सहकार क्षेत्रातत ही याच भागातील नागरिक मोठ्या पदावर आहेत. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष यांनी मोठा विश्वास या भागातील कार्यकर्ते यांच्यावर टाकत या भागावर अनेक वर्ष निर्विवाद वर्चस्व निर्माण केली. कोणतीही ही निवडणूक असो विजय बहुजन विकास आघाडी चाच असायचा कोणी ही व्यक्ती उभी केली तर हितेंद्र यांच्या नावावर या भागात केलेल्या विकास कामांवर निवडून यायची पण या भागातील कार्यकत्यांची सामान्य माणसाची नाळ तुटल्याने व कार्यकर्ते मोठे झाल्याने जनमत दुरावले गेले याचा परिणाम या लोकसभा निवडणुकीत होत बहुजन विकास आघाडीची सत्ता असलेल्या गावात युतीने आघाडी घेतली यामुळे या भागात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून बहुजन विकास आघाडीला ही आता मंथन करावे लागणार आहे.