तिवराची कत्तल करणा-यांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:34 AM2017-08-01T02:34:23+5:302017-08-01T02:34:23+5:30

सातपाटी फड येथील स्मशानभूमी शेजारील खारभूमीवरील हजारो तिवरांची कत्तल करून अतिक्रमण करणाºया चारजणांना प्रांताधिकारी विकास गजरे यांच्या आदेशाने सातपाटी सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.

To bail them out of Tihar | तिवराची कत्तल करणा-यांना जामीन

तिवराची कत्तल करणा-यांना जामीन

Next

पालघर : सातपाटी फड येथील स्मशानभूमी शेजारील खारभूमीवरील हजारो तिवरांची कत्तल करून अतिक्रमण करणाºया चारजणांना प्रांताधिकारी विकास गजरे यांच्या आदेशाने सातपाटी सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. रविवारी त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
फडा वर राहणाºया राकेश ज मोरे, निकेत ज मोरे, प्रल्हाद ज मोरे, व रामकृष्ण स मोरे या चौघांनी स्मशानभूमी शेजारील हजारो तिवरांची झाडे तोडून त्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार सदाशिव ह माळी, प्रवीण ब माळी व इतर दोघांनी महसूल विभागाकडे केली होती. प्रांताधिकाºयांनी १३ एप्रिल व २४ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत हे अतिक्रमण करण्यात आल्याचे सप्रमाण निदर्शनास आणून देण्यात आले होते.
त्यांच्या आदेशानुसार तहसीलदार महेश सागर(पथक प्रमुख) यांनी स्वत: सागरी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक रुपाली गुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी दळवी, प्रदूषण मंडळाचे होळकर आदींच्या पथकाच्या सोबत ड्रोन च्या सहाय्याने या अतिक्रमणाची पाहणी केली. त्यावेळी तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यांनतर मंडळ अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादी वरून वरील चार जणांविरोधात भारतीय वन पर्यावरण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.

Web Title: To bail them out of Tihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.