बळीराजाची दिवाळी जाणार अंधारातच, पावसाने केली भातपिकांची नासाडी : शेतक-यांना तातडीच्या मदतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:04 AM2017-10-10T02:04:52+5:302017-10-10T02:05:04+5:30

परतीच्या पावसाने तीन दिवस जोरदार धुमाकूळ घातल्याने कापणी केलेले भाताला मोड येऊन पीक वाया गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हळवी पीक कापणी केली असतांनाच वरुणराजाने जोरदार आक्रमण केल्याने वसई तालुक्यातील शेकडो हेक्टरातील

 Baliaraj's Diwali is going on in the dark, rain ruined rice paddy: farmers need urgent help | बळीराजाची दिवाळी जाणार अंधारातच, पावसाने केली भातपिकांची नासाडी : शेतक-यांना तातडीच्या मदतीची गरज

बळीराजाची दिवाळी जाणार अंधारातच, पावसाने केली भातपिकांची नासाडी : शेतक-यांना तातडीच्या मदतीची गरज

Next

पारोळ : परतीच्या पावसाने तीन दिवस जोरदार धुमाकूळ घातल्याने कापणी केलेले भाताला मोड येऊन पीक वाया गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हळवी पीक कापणी केली असतांनाच वरुणराजाने जोरदार आक्रमण केल्याने वसई तालुक्यातील शेकडो हेक्टरातील भातांचे नुकसान झाले. त्यामुळे या वर्षीची दिवाळी अंधारात जाणार आहे. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकाऊन घेतल्याने वसईतील शेतकºयांना मदती ची गरज असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती वसई चे प्रकाश पाटील यांनी लोकमत ला सांगीतले.
या पावसाने आडणे, भाताणे, कोपर खानिवडे, शिरवली, सायावन, पारोळ, उसगाव, मेढे वडघर, माजिवली, देपिवली इ. गावात मोठे नुकसान केले. शेतात पाणी साचल्याने भाताची करपे पाण्यावर तरंगतांना दिसत आहेत.
सरकारने पालघर जिल्ह्यातील भातशेती नुकसानीचे पंचनामे करावेत-निलेश सांबरे
विक्रमगड : पालघर जिल्हयात गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या पावसाने कापणी केलेल्या भातशेतीचे पुरते वाटोळे केले असून या या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनी केली असून आपण याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कमी प्रमाणात पीक घेण्यात येणारी हलवार शेतीची कापणी आटोपून, शेतकरी गरवा या प्रकारातील मुख्य भात शेतीचे हाताशी आलेले भरघोस पीक घरात आणण्याच्या वेळीच पावसाने या शेतीची उडविलेली धूळधाण पाहता पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. जे काही थोडेफार पीक उरले आहे त्यावर विविध रोग आणि कीड यांचा प्रादुर्भाव झाला आहे.
त्याच बरोबर सध्या न झालेल्या भात पिकावर तुडतुड्या व खोडकीडा पडण्याची लक्षणे दिसत असल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे. हा रोग झाल्यास भात पीक हाती लागतंच नाही असा शेतकºयांचा अनुभव आहे.विक्रमगड तालुक्यात या पावसामध्ये वीज पडून दोन
जणांना आपला प्राण गमवावा लागला तर ३५ ते ४० घरांचे मोठयाप्रमाणावर नुकसान झाले आहे अनेकांच्या शेतातील भाताचे तयार पीक आडवे पडले आह.
या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना पुन्हा ऐकदा मारले त्यामुळे येथील शेतकºयांपुढे दिवाळी कशी साजरी करावी? हा मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे या परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त केलेल्या शेतकºयांना आधार देण्यासाठी शासनाने त्वरीत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून भरपाईचे वाटप तातडीने करावे. तसेच भातावर पडणाº्या रोगावर औषध उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश कृषी खात्याला द्यावेत अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. तर दिवाळीसाठी खावटी दयावी अशीही मागणी आहे

Web Title:  Baliaraj's Diwali is going on in the dark, rain ruined rice paddy: farmers need urgent help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.