बळीराजा धास्तावला, वेधशाळेने वर्तविली पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 03:11 AM2018-03-15T03:11:37+5:302018-03-15T03:11:37+5:30

वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असून या आठवड्याच्या अखेरीस पालघर जिल्ह्यात वारा व गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविलीे आहे.

Baliharaja feared, the observatory expected the possibility of rain | बळीराजा धास्तावला, वेधशाळेने वर्तविली पावसाची शक्यता

बळीराजा धास्तावला, वेधशाळेने वर्तविली पावसाची शक्यता

googlenewsNext

अनिरुद्ध पाटील
बोर्डी: वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असून या आठवड्याच्या अखेरीस पालघर जिल्ह्यात वारा व गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविलीे आहे. त्या मध्ये डहाणू तालुक्याचा समावेश असून बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. या हवामानाचा भाजीपाल्यावर परिणाम होणार असल्याने बळीराजा धास्तावला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार १६ आणि १७ मार्च रोजी वादळ तसेच गडगडाटांसह पावसाची शक्यता असून त्यानंतर १८ व १९ मार्च या दोन दिवसांतही पाऊस पडू शकतो असे म्हटले आहे. या विभागाच्या वेबसाईटवर या बाबतची माहिती दिली आहे. त्याचे पडसाद बुधवारपासून ढगाळ वातावरणाने दिसले.
शिवाय प्रचंड उकाडा जाणवत होता. दहावीची परीक्षा देणार्?या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. नागरिकांना डोकेदुखीसह मळमळ आणि प्रकृती अस्वास्थतेचा त्रास जाणवला. या खराब हवामानाचा सर्वात अधिक फटका भाजीपाल्याला बसणार आहे.
या हंगामातील मिरची हे प्रमुख पीक आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील या पिकाच्या लागवडी खालील क्षेत्र मागील चार ते पाच वर्षांपासून झपाट्याने विस्तारले आहे. या पिकाकरिता प्रती एकरी खर्च जास्त असतो. त्या मध्ये पीक संरक्षणासाठी अधिकचे कीटकनाशक फवारावे लागणार असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओखी वादळाच्या तडाख्यातून बळीराजा पुरता सावरलेला नाही. त्या वेळी झालेल्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असून उत्पादनात कमालीची घट जाणवत आहे.
>बागायतीला मोठा फटका
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार वाºयासह पाऊस झाल्यास त्याचा फटका वेलवर्गीय व मिरची पीक तसेच सफेदजांबू (जाम), लिची, आंबा आणि नारळ या बागायती पिकांवर होईल. शिवाय सुकीमच्छी आणि ताडी उद्योगालाही फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Baliharaja feared, the observatory expected the possibility of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी