कळवा-ऐरोली एलेव्हेटेड रेल्वेत झोपड्यांचा अडथळा

By admin | Published: June 21, 2017 04:13 AM2017-06-21T04:13:57+5:302017-06-21T04:13:57+5:30

ऐरोली-कळवा या नव्याने होणाऱ्या एलिव्हेटेड मार्गात आता अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या मार्गात बदल करून तो मार्ग मफतलाल कंपनीच्या बाजूने पुढे

Banana-Aroli Elevated Railway Halted Hut | कळवा-ऐरोली एलेव्हेटेड रेल्वेत झोपड्यांचा अडथळा

कळवा-ऐरोली एलेव्हेटेड रेल्वेत झोपड्यांचा अडथळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ऐरोली-कळवा या नव्याने होणाऱ्या एलिव्हेटेड मार्गात आता अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या मार्गात बदल करून तो मार्ग मफतलाल कंपनीच्या बाजूने पुढे न्यू शिवाजीनगर येथून जाणार आहे. त्यामुळे या भागात असलेल्या तब्बल ५५० झोपड्यांवर बुलडोझर फिरवला जाणार आहे. यामुळे पूर्वीच्या मार्गानेच एलिव्हेटेड न्यावा, अशी मागणी करून तेथील रहिवाशांनी रेल्वेमार्फत सुरू असलेल्या सर्व्हेक्षणाला विरोध केला आहे. आधी याच भागात पुनर्वसनाची हमी द्या, अन्यथा जीव गेला तरी झोपड्यांवर बुलडोझर फिरवू दिला जाणार नसल्याचा इशारा आता राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नवीन मार्गाचे भूमिपूजन डिसेंबर २०१६ मध्ये होऊनसुद्धा अद्याप कामास सुरु वात झालेली नाही. नवीन मार्गासाठी मफतलाल कंपनीची अंदाजे ७१ गुंठे जागा रेल्वेला देण्याचे ठरले असून त्याच्या भूसंपादनासाठी रेल्वे व जिल्हाधिकाऱ्यांचा संयुक्त सर्व्हेदेखील करण्याची तयारी केली होती. परंतु, स्थानिकांच्या विरोधामुळे या कामाला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. दरम्यान, एमयूटीपी-३ या तिसऱ्या टप्प्यातील कामात दिघा या नवीन रेल्वे स्थानाकाचाही समावेश असल्याने दिघा या नवीन रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेली जागा मिळवण्यासाठी रेल्वेने प्रस्ताव एमआयडीसीला पाठवला असून ती मिळाल्यास काम सुरु होईल. दरम्यान, आता काही दिवसांपूर्वीदेखील या भागात सर्व्हे करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, येथील रहिवाशांनी तो होऊ दिलेला नाही. एमएमआरडीएमार्फत घरे दिली जाणार आहेत. परंतु, ती भांडुप अथवा मुंबईच्या इतर भागांत दिली जाणार असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. रहिवाशांचे या भागातील रेल्वे कॉलनी अथवा रेल्वेच्या इतरत्रच्या जागेत, परंतु येथेच पुनर्वसन करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक महेश साळवी यांनी केले आहे. पूर्वीचा मार्ग के.आर. स्टील कंपनीपासून जाणार होता. नंतर, पुन्हा तो बदलला. आता पुन्हा त्यात बदल केला आहे.

Web Title: Banana-Aroli Elevated Railway Halted Hut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.