पाचशे मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणारा बांगलादेशी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 05:11 AM2018-09-09T05:11:31+5:302018-09-09T05:11:42+5:30

बांगलादेशातून तरूण व अल्पवयीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलणाऱ्या टोळीच्या मोरक्याच्या गुरुवारी वसई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Bangladeshi detention of 500 girls in prostitution | पाचशे मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणारा बांगलादेशी अटकेत

पाचशे मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणारा बांगलादेशी अटकेत

Next

नालासोपारा : बांगलादेशातून तरूण व अल्पवयीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलणाऱ्या टोळीच्या मोरक्याच्या गुरुवारी वसई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीने वर्षभरात तब्बल ५०० मुलींची भारतात तस्करी केल्याचे समोर आल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. टोळीचा मुख्य मोरक्या गजाआड झाला असला तरी अजून ११ संशयीत आरोपी फरार आहेत.
गेल्यावर्षी पोलीसांनी चार अल्पवयीन मुलींची वेश्याव्यवसायातून मुक्तता केली होती. त्यावेळी या चार मुलींची चौकशी केली असता त्यांना बांगलादेशातून भारतात चांगली नोकरी देण्याच्या आमिषावर आणण्यात आल्याचे समोर आले आहे. फसवून या मुलींना भारतात आणल्यावर जबरदस्तीनी वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते. या मुलींना आणणाºया टोळीचा पोलीस शोध घेत असता टोळीचा म्होरक्या मोहम्मद सैदुल मुस्लीम शेख (३८) हा असल्याचे समोर आले.
मात्र, तो वर्षभर पोलिसांना गुंगारा देत होता. तत्कालीन पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी आपल्या टीममार्फत या टोळीचा शोध सुरू ठेवला होता. अखेर पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई कक्षेचे प्रमुख जितेंद्र वनकोटी, जितेंद्र विचारे यांंच्या पथकाला या कामी यश आले आहे. मोहम्मद सैदुल मुस्लीम शेख चा ठावठिकाणा लागल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
>उच्चभ्रू वस्तीत वास्तव्य
अटक केलेला मोहम्मद सैदुल मुस्लीम शेख हा बांगलादेशी नागरीक असून, नोडीया जिल्ह्यातील रहिवासी आहे. मात्र, तो मुंबई, डोंबिवली, मानपाडा येथील उच्चभ्रू वस्तीत राहात असल्याचे समोर आले आहे. बांगलादेशातील गरीब असहाय मुलींना भारतात चांगल्या पगाराची नोकरी देतो, असे आमिष दाखवून तो वेगवेगळ्या ठिकाणी कुंटणखान्यात त्यांना विकत असे.

Web Title: Bangladeshi detention of 500 girls in prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक