भात खरेदी केंद्राचा ‘आधार’ हरपला?; शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:56 PM2020-03-12T23:56:06+5:302020-03-12T23:56:15+5:30
तीन महिन्यांपासून भात खरेदीचे पैसेच मिळाले नाहीत
पारोळ : सरकारने थकीत कर्जमाफी व नियमित हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण असतानाच वसई तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत भात खरेदी केंद्रावर तीन महिन्यांपासून भात खरेदीचे पैसे हातात न आल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे. होळी सण साजरा करायला तरी भात खरेदीचे पैसे मिळतील या आशेवर शेतकरी असताना सणाच्या दिवसातही खात्यात पैसे जमा न झाल्याने शेतकºयांचा हिरमोड झाला आहे.
या वर्षी आधारभूत भात खरेदी केंद्रावर क्विंटलमागे दरात व देण्यात येणाºया बोनसमध्ये वाढ झाल्याने या वर्षी ही दरवाढ बळीराजाला दिलासा देणारी होती. मागील वर्षी क्विंटलमागे १७५० व बोनस २०० रुपये असा शासनाचा भाताला हमीभाव होता. पण या वर्षी दरात वाढ होत १८५० व बोनस ७०० असा दर लागू झाल्याने शेतकरी बांधवांसाठी समाधानाची बाब असतानाच आता या वर्षी झालेल्या पीक नुकसानीतही भात खरेदी केंद्रावर चांगला दर मिळाल्याने चांगले हातात पडेल अशी आशा शेतकरी वर्गाला असतानाच काही शेतकºयांनी २४ डिसेंबरला भात खरेदी केंद्रावर भाताची विक्र ी केली होती. पण त्या विक्र ीचे पैसे अजूनही खात्यात जमा न झाल्याने शेतकरी वर्गाला अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही शेतकºयांच्या घरी लग्न आहे, तर काहींच्या मुलांची शालेय फी भरायची आहे. अशी परिस्थिती असताना भात खरेदी केंद्राचे पैसे खात्यात पडत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे.
भात पीक घेणे हे आता शेतकºयांसाठी महागडे ठरत असून बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी, टॅक्टरचे वाढणारे दर, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयांना भात पीक घेणे परवडत नाही. काही शेतकरी दागिने गहाण ठेवत तर काही सेवा सोसायटीचे कर्ज घेत भात पिकांची लागवड करतात. पीक लागवडीचा खर्च वजा केला असता त्यांच्या हातात काहीच उरत नाही. जर हा भात व्यापारीवर्गाला विकला तर त्यांचा दर हा विंटलमागे १२०० ते १५०० असा आहे. त्यामुळे व्यापारीवर्ग शेतकरी वर्गाची मोठी पिळवणूक करतात. यामुळे वसईतील शेतकºयांच्या धान विक्रीसाठी राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत वसई तालुक्यात दोन भात केंद्रे सुरू करण्यात आली. त्या अंतर्गत शिरवली, मेढे व भिनार या ठिकाणी डिसेंबर महिन्यापासून भात खरेदी सुरू करण्यात आली. मात्र त्याचे पैसे अद्याप खात्यात जमा झालेले नाहीत.
भात खरेदी केलेल्या शेतकºयांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले नसून याबाबतची सर्व कागदपत्रे प्रादेशिक कार्यालय जव्हार येथे सादर करण्यात आली आहेत. पुढील आठवड्यात पैसे शेतकºयांच्या खात्यात जमा होतील. - मोहन इंगळे, अधिकारी आदिवासी विकास महामंडळ