आधारभूत भातखरेदी केंद्र सुरू, अन्य तालुक्यांनाही केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:42 AM2017-11-24T02:42:56+5:302017-11-24T02:45:43+5:30
विक्रमगड : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक व प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय मोखाडा यांच्या मार्फत पोशेरी येथे आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री व जिल्हाचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते झाले.
विक्रमगड : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक व प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय मोखाडा यांच्या मार्फत पोशेरी येथे आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री व जिल्हाचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी ते म्हणाले कि शेतकºयांची पिळवणूक होऊ नये त्याच्या धान्याला रास्त भाव मिळावा म्हणून शासनाने आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत धान्य खरेदी योजना सुरु केली असून आज पासून पालघर जिल्हात भात खरेदी केंद्र सुरु होणार आहेत. शेतकºयाने काबाडकष्ट करून वर्षातून एकदा पिकवलेल्या धान्याला रास्त भाव मिळावा म्हणून शासनाने आदिवासी विकास महामंडळामार्फत धान्य खरेदी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने खरीपाचे पिक आॅक्टोबर महिन्यात हातात येते. त्यातून शेतकºयांना चार पैसे मिळावेत याकरिता हे केंद्र सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आधारभूत खरेदी योजनेतर्गत अ ग्रेड भाताला प्रति क्विंटल १५९० रुपये, साधारण भाताला प्रति क्विंटल १५५० रुपये भाव देण्यात येणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्र भाजपाचे राज्य सदस्य बाबाजी काठोळे, पोशेरीच्या सरपंच सौ. स्वरा दगडा, उपसरपंच सुकर कोम, तसेच महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक डी एस. चौधरी, उपप्रादेशिक व्यवस्थापक एच.एम. बोराले आदी उपस्थित होते.
>उत्तम दर्जाचा भात १५९० रु. क्विंटल
पालघर जिल्यात ३९ खरेदी केंदे्र मंजूर करण्यात आलेली असून, सर्वसाधारण भातास १५५० रु पये तर ‘अ’ दर्जाचा भाताला १५९० रुपये प्रति क्विंटल दर देण्यात आला. तसेच शेतकºयांना त्यांच्या खात्यावर आॅनलाईन पद्धतीने पैसे जमा करण्यात येणार आहेत.
-धीरज चौधरी ,
प्रादेशिक व्यवस्थापक, जव्हार
आधारभूत भात खरेदी केंद्राच्या उदघाटना नंतर पालकमंत्री विष्णू सवरा शेतकºयाशी संवाद साधतांना.