बॅसिन भरती, पदोन्नतीत मागासवर्गीयांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:33 AM2017-08-01T02:33:43+5:302017-08-01T02:33:43+5:30

बॅसीन कॅथॉलिक बंँकेत मागासवर्गीय कर्मचारी भरती आणि पदोन्नतीत मनमानी कारभार सुरु असल्याप्रकरणी आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या निर्देशकांनी राज्याच्या सहकार आयुक्तांना दिले आहेत.

In Basin recruitment, injustice to the promoted backward class | बॅसिन भरती, पदोन्नतीत मागासवर्गीयांवर अन्याय

बॅसिन भरती, पदोन्नतीत मागासवर्गीयांवर अन्याय

Next

वसई : बॅसीन कॅथॉलिक बंँकेत मागासवर्गीय कर्मचारी भरती आणि पदोन्नतीत मनमानी कारभार सुरु असल्याप्रकरणी आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या निर्देशकांनी राज्याच्या सहकार आयुक्तांना दिले आहेत.
बँकेत मागासवर्गीय कर्मचारी भरती आणि पदोन्नतीत मोठा घोटाळा झाला असून मागासवर्गींयावर अन्याय झाल्याची तक्रार भाजपाचे वसई शहर अध्यक्ष मारुती घुटुकडे यांनी राज्याच्या सहकार आयुक्तांकडे केली होती. मात्र, सहकार आयुक्तांनी दखल न घेतल्याने त्यांनी केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती. यावरून आयोगाने सहकार आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश २२ मे २०१७ रोजी दिले होते. मात्र, त्यानंतरही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई न झाल्याने आयोगाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी आयोगाचे निर्देशक डॉ. ओ. ए. बेडेकर यांनी राज्याच्या सहकार आयुक्तांना एक खरमरीत पत्र पाठवून चौकशी करून आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने २२ मे २०१७ रोजी पाठवलेल्या पत्राचे अवलोकन करण्याची कष्ट करा.
याविषयी काय कारवाई केली याचा अहवाल अद्याप आपण पाठवलेला नाही. म्हणून आयोगाने ही बाब अतिशय गंभीरपणे घेतली
आहे.
याप्रकरणी आठ दिवसात अहवाल पाठवण्याचे कष्ट करा, अशा शब्दात आयोगाने राज्याच्या सहकारआयुक्तांची कानउघडणी केली आहे. आता त्याबाबत ते कोणती कारवाई करतात या कडे सगळ््यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: In Basin recruitment, injustice to the promoted backward class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.