ही लढाई आदिवासींच्या अस्मितेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 03:47 AM2018-05-25T03:47:31+5:302018-05-25T03:47:31+5:30
जव्हारमध्ये झाली सभा : उद्धव उतरले रस्त्यावर, कल्याण-डहाणू-नाशिक रेल्वे साकारा
जव्हार : पालघर लोकसभा पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजप ने प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेने वनगा स्वर्गीय चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी, शिवसेना पक्ष प्रमुख ऊध्दव ठाकरे प्रचारासाठी, रस्त्यावर ऊतरले आहे. त्यांनी आज मोखाडा, जव्हार, विक्र मगड, वाडा आणि डहाणू तालुक्यातील मतदारांशी संपर्क थेट साधला.
ही लढाई, भाजप बरोबर नसून, वनगा कुटुंब आणि आदिवासींच्या अस्मितेची असल्याचे सांगून , उध्दव ठाकरे यांनी आदिवासी मतदारांना शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
भाजपने स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, वनगा कुटुंबाला वाळीत टाकले. मात्र, राजेंद्र गावीत यांना दिड वर्षापासून विधानसभेची उमेदवारी देण्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात जाहीर केले. मात्र, चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, तीन महिने होऊनही, त्यांचे साधे सांत्वन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप ने केले नाही. त्यावेळी वनगांच्या कुटुंबीयांनी, मातोश्री वर येऊन शिवसेनेनेत प्रवेश केला. वनगांना खरी श्रध्दांजली, अर्पण करण्यासाठी श्रीनिवास यांना निवडून द्यावे, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी या दौऱ्यात केले आहे.
तसेच दिवंगत चिंतामण वनगा यांनी डहाणू नाशिक रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्ने केले मात्र या भाजप सरकारने त्यांना साथ देण्याऐवजी अनावश्यक असे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, बडोदा हायवे, प्रकल्प सुरू करु न आदिवासीेंची जमीन उकळ्याचे काम चालविले आहे. ते आपल्याला हाणून पडायचे आहे आणि आपण धनुष्यबाणला मतदान करणार मात्र मतदान केल्यावर लाईट धनुष्यबाणचा जळतो की नाही ते पहिले बघा, आणि आता स्लीप सुद्धा निघणार ती ही पहा असे आवाहन त्यांनी केले.
भाजप ने स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या कुटुंबाला न्याय देऊ शकले नाहीत, ते काय तुम्हाला न्याय देणार असा सवाल त्यांनी केला. भाजप ची पाया खालची वाळू सरकली आहे. म्हणूनच भाजपने महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ या प्रचारात उतरविले आहेत, असे ते म्हणाले.