बुडालेला मुलाच्या मृत्युचे कारण फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:16 AM2017-07-31T00:16:24+5:302017-07-31T00:16:24+5:30

एका चार वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असताना शवविच्छेदन अहवालात डॉक्टराने मृत्युचे कारण फाशी असे नमूद केल्याने

baudaalaelaa-maulaacayaa-martayaucae-kaarana-phaasai | बुडालेला मुलाच्या मृत्युचे कारण फाशी

बुडालेला मुलाच्या मृत्युचे कारण फाशी

Next

वसई : एका चार वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असताना शवविच्छेदन अहवालात डॉक्टराने मृत्युचे कारण फाशी असे नमूद केल्याने मुलाच्या पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना नालासोपारा शहरात घडली. 
आयुषकुमार पटेल (४) असे मृत बालकाचे नाव आहे. नालासोपारा येथील श्री राम नगरमध्ये राहणारा आयुषकुमार शुक्रवारी संध्याकाळी झाल्याने त्याची शोधाशोध करण्यात आली. रात्री त्याचा मृतदेह घरापासून दोन किलोमीटर दूर असलेल्या एका बांधकाम सुरु असलेल्या पाण्याच्या उघड्या टाकीत आढळून आला. शनिवारी शवविच्छेदन केल्यानंतर आयुषकुमारवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
मात्र, संध्याकाळी तुळींज पोलिसांनी आयुषच्या वडिलांना बोलावून पोस्टमार्टेम अहवाल परत करण्याची मागणी केली. तसेच आयुषच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची घाई का केली म्हणून धारेवर धरून त्यांना अपमानास्पद वागणूकही दिली. 
रिपोर्टमध्ये काही तरी गडबड असल्याचा संशय आल्याने आयुषचे वडिल हरीकुमार पटेल यांनी एका ओळखीच्या डॉक्टरांना रिपोर्ट दाखवला. त्यावेळी रिपोर्टमध्ये मृत्युचे कारण फाशी लागल्याचे नमूद केल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला. त्यानंतर हरीकुमार यांनी आयुषच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पुन्हा करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी ती मागणी फेटाळून लावत शवविच्छेदन अहवाल शवविच्छेदन करणारे डॉ. अविनाश डोंगरे यांच्याकडून बदलून घेतला. 
डॉ. डोंगरे यांनी आपली चूक मान्य करीत दिलगीरी व्यक्त केली आहे. दिवसभर आत्महत्येप्रकरणी शवविच्छेदन केले होते. त्यामुळे नजरचुकीने आयुषच्या अहवालात चुकीची नोंद झाल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला आहे. 
तर याप्रकरणात चौकशी सुरु आहे. आ़युषचा पाण्यात बुडूनच मृत्यु झाला आहे. डॉक्टरांकडून नजरचुकीने चुकीचे नोंद झाली आहे, अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी दिली.

Web Title: baudaalaelaa-maulaacayaa-martayaucae-kaarana-phaasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.