वसईतील ३०० प्राचीन बावखले नष्ट होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 12:29 AM2019-05-06T00:29:16+5:302019-05-06T00:34:14+5:30

वसईकरांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असलेली बावखलांची संख्या २०० ने घटल्याने वसईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

bavkhal in Vasai | वसईतील ३०० प्राचीन बावखले नष्ट होण्याच्या मार्गावर

वसईतील ३०० प्राचीन बावखले नष्ट होण्याच्या मार्गावर

googlenewsNext

- सुनील घरत
पारोळ - वसईकरांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असलेली बावखलांची संख्या २०० ने घटल्याने वसईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या बावखलांचे योग्य संवर्धन न झाल्याने उरलेली ३०० बावखलेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ते संवर्धन करण्याची गरज असून त्या साठी सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे.

वसईच्या पश्चिम पट्टयÞात बावखलांची संख्या मोठयÞा प्रमाणावर आहे. शेतीसाठी, पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी याच बावखलांच्या आणि नजीकच्या विहिरींचा वापर होतो. वसईत पूर्वी ५०० च्या आसपास बावखले होती. त्यांची संख्या आता ३०० पर्यंत येऊन पोहोचलीआहे. पाण्यातील क्षार संतुलित ठेवण्यासाठी बावखलेंचा उपयोग केला जातो. वसईत जेव्हा बावखलेंची संख्या ५०० च्या आसपास होती तेव्हा पाण्यातील क्षार हे १०० ते १५० च्या आसपास होते. ते आता ५०० ते ६०० पर्यंत पोचले आहेत. 

वसईत मोठयÞा प्रमाणावर लोकसंख्या वाढल्याने जागेच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे खाजगी बावखले नष्ट करून त्यावर भराव टाकून ही त्याजागी गृहसंकुले बांधली जात आहेत. या साठी बावखले असलेली जागा वसई विरार महापालिकेने आरक्षित करून बावखले वाचवण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.

बावखले म्हणजे मोठा खड्डा त्यात पावसाचे पाणी जमा केले जाते. वसईचा भूप्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गोडयÞा पाण्याच्या साठयÞासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. त्यामुळे हि बावखले वाचवणे, साफ करण्याची, संवर्धन करण्याची ही काळाची गरज आहे. बावखलेच राहिली नाही तर वसईकरांना गेल्यावर्षी प्रमाणे यंदा देखील ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

बावखले वाचले तर वसईतील पाण्याचे नैसिर्गक स्त्रोत वाचतील, या भागातील निसर्ग संपदा साठी ही पाणी उपलब्ध होईल यासाठी बावखले वाचवणे ही काळाची गरज आहे.
-विजय चोघळा,
अध्यक्ष पालघर जिल्हा पर्यावरण मित्र संघटना

Web Title: bavkhal in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.