बविआच्या जाधवांना स्वातंत्र्य नाही, गावितांची खुर्चीसाठी धावाधाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:16 PM2019-04-20T23:16:19+5:302019-04-20T23:16:40+5:30
वसईमध्ये करबटांचे टीकास्त्र; भूमिपूत्र बचाव आंदोलनाची जाहीर सभा
वसई : महाआघाडीचा मित्रपक्ष म्हणून बविआच्या उमेदवाराला आम. ठाकूरांना विचारल्या खेरीज स्वत:चे मत व कुठलेही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यच नाही, तर दुसरीकडे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार खास. गावित हे केवळ खुर्चीसाठी वारंवार पक्ष बदलत असल्याने या दोघांवर पालघर जिल्ह्याचे मतदार कुठल्या मानसिकतेनं विश्वास ठेवणार असे परखड विचार भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे उमेदवार दत्ताराम करबट यांनी वसईच्या वाघोलीत मांडले. पालघर लोकसभेच्या मतदारसंघात प्रचार, जाहीर सभा व कॉर्नर सभाना आता भर उन्हात देखील कमालीचा वेग येताना दिसत असून एका पाठोपाठ एक अशा सर्व पक्षीय व संघटना यांच्या जाहीर सभा संपन्न होत आहेत.
वसईच्या पश्चिम पट्टीत वाघोली गावाच्या माळीआळी येथे शुक्र वारी संध्याकाळी भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे पालघर लोकसभेचे उमेदवार दत्ताराम करबट यांची पहिली जाहीर सभा संपन्न झाली. या जाहीर सभेसाठी मंचावर भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे उमेदवार दत्ताराम करबट, बुलेट ट्रेन विरोधी आदिवासींचे नेते काळुराम काका दोधडे, जेष्ठ विधिज्ञ नॉव्हेल डाबरे, शशी सोनावणे, पर्यावरण समनव्यक समीर वर्तक, दत्ता सांबरे, विधिज्ञ धनंजय चव्हाण, जेष्ठ सालू कजार, गोडसंन डायस, मेकेन्जी डाबरे व प्रकाश जाधव आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टिका केली.
जनतेचे प्रश्न कसे मांडणार
महाआघाडीच्या उमेदवाराला स्वत:चे मत, निर्णय व कुठलही अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नसेल तर महायुतीच्या उमेदवाराला केवळ खुर्चीची लालसा असून सत्ते व्यक्तिरिक्त जनतेची किंमतच राहिलेली नसेल तर आपण का म्हणून त्यांना निवडून द्यावयाचे असे करबट यांनी सांगितले.