बोईसरच्या बहुसंख्य शाळांमध्ये विद्यार्थिनीच ठरल्या बाजीगर
By admin | Published: June 14, 2017 02:52 AM2017-06-14T02:52:25+5:302017-06-14T02:52:25+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला त्यामध्ये विद्यार्थीनी
- पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला त्यामध्ये विद्यार्थीनी चांगले गुण संपादन केले आहेत.
एमआयडीसीतील तारापूर विद्यामंदिर शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून पूर्वा संखे ही विद्यार्थी नी ९७.७ गुण मिळवून प्रथम आली असून श्रेया दांडेकर (९६) द्वितीय तर भाग्यश्री पाटील (९४.४) तृतीय आली आहे. तर तारापूरच्या रा.ही.सावे विद्यालय या शाळेचा निकाल ९३.३० टक्के लागला असून संपदा चंद्रशेखर साठे ९७.६० गुण मिळवून प्रथम तर चरीत सावे (९४.८० टक्के ) द्वितीय, सुरभी सावे (९४.४० टक्के ) तृतीय आली आहे. डॉन बॉस्को स्कूल ( बोईसर) शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून वैष्णव कदम ९४.८० टक्के गुण मिळून प्रथम तर अनिकेत साठे (९१.६० टक्के) द्वितीय, प्रज्ञा मोरटगी (९१.२० टक्के) आणि प्रतिक शिंदे (९१.२० टक्के) हे दोन्ही विद्यार्थी तृतीय आले आहेत. डॉ.स.दा. वर्तक विद्यालय बोईसर, मराठी माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला असून मराठी माध्यमात अनघा जागुष्टे व जान्हवी इंगळे या दोन विद्यार्थी नी ९४.८० टक्के गुण मिळवून प्रथम द्वितीय शिवानी धुमाळ (९१.८० टक्के) तर प्राची पाटील (९१.६० टक्के) तृतीय आली आहे तर याच शाळेच्या हिन्दी माध्यमाचा ९६.१५ टक्के निकाल लागला असून सेजल जैन व सृष्टी यादव ८८.४० टक्के गुण मिळवून प्रथम नेहा कुमारी सिह (८८.२० टक्के) द्वितीय तर तृतीय अमिषा गुप्ता (८४.०० टक्के) आली आहे. स्व.सौ. विद्या विनोद अधिकारी विद्यालय, लालोंडे या शाळेचा निकाल ९५.०४ टक्के लागला असून हार्दीक पाटील हा विद्यार्थी ८९.८० टक्के गुण मिळवून प्रथम आला असून सोनल दौडा (८५.६० टक्के) द्वितीय, तर विक्रांत घरत (८५ टक्के) तृतीय आला असून या शाळेमध्ये बोईसर पूर्व पट्टीच्या ग्रामीण व दुर्गम भागातील बहुसंख्य आदिवासी गोरगरीब विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत.