सुरुंच्या बागेतील पक्ष्यांची तस्करी, टोळ्यांकडून दुर्मीळ प्रजातींची होते आहे शिकारही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 03:20 AM2017-10-28T03:20:00+5:302017-10-28T03:20:24+5:30

डहाणू/बोर्डी : येथील समुद्रकिना-यावरील सुरुंच्या बागेत नायलॉनचे जाळे आणि पायफासे लावून मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची शिकार केली जात आहे

Beginning birds in the garden, there are rare species of the victims | सुरुंच्या बागेतील पक्ष्यांची तस्करी, टोळ्यांकडून दुर्मीळ प्रजातींची होते आहे शिकारही

सुरुंच्या बागेतील पक्ष्यांची तस्करी, टोळ्यांकडून दुर्मीळ प्रजातींची होते आहे शिकारही

Next

अनिरुद्ध पाटील 
डहाणू/बोर्डी : येथील समुद्रकिना-यावरील सुरुंच्या बागेत नायलॉनचे जाळे आणि पायफासे लावून मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची शिकार केली जात आहे. हा प्रकार थांबवण्याकरिता वन विभागाने तत्काळ पाऊल उचलण्याची मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे.
डहाणू तालुक्याला ३५ किमी लांबीचा समुद्रकिनारा असून किनारा धूप प्रतिबंधाकरिता सुरुंची लागवड केली आहे. या गर्द हिरवाईने परिसराला अनोखे सौंदर्य लाभले आहे. लगतच खाजण क्षेत्र असल्याने समुद्रपक्षांसह पाणथळ पक्ष्यांचा अधिवास येथे आहे. या मध्ये ऋतुमानानुसार येणाºया पाहुण्या पक्षांचीही भर पडते. यामुळे पर्यटकांसह पक्षी निरीक्षक, वाईल्डलाईफ छायाचित्रकारांनाही आकर्षित केले आहे. मात्र नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी किनाºयावरील गावातील काही अविवेकी लोकांनी पक्ष्यांची शिकार करण्याचा सपाटाच लावला आहे. गलोलीने होणाº्या शिकारी सोबतच नायलॉन जाळे आणि दोरीचे पायफासे लावले जातात त्यामध्ये पक्षी फसतात.
>पहाटेच होतात
हे गोरखधंदे
हे शिकारी भल्या पहाटे जाऊन त्यांना ताब्यात घेतात. काहींना खाण्यासाठी तर काहींना पाळीव म्हणून विकतात. घुबड, सताना, घार, खंड्या, होला, पोपट, वटवाघूळ तसेच विविध दुर्मिळ पाणथळ पक्ष्यांचा या मध्ये समावेश आहे. हा प्रकार तत्काळ थांबविण्याकरिता कडक कारवाईची आवश्यकता आहे.

Web Title: Beginning birds in the garden, there are rare species of the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.