हजारोंच्या उपस्थितीत वंजारी महोत्सवाची सुरुवात
By admin | Published: December 25, 2016 12:00 AM2016-12-25T00:00:07+5:302016-12-25T00:00:07+5:30
हजारो वंजारी समाज बांधवांच्या उपस्थितीत आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणात वंजारी महोत्सवचा शानदार प्रारंभ शनिवारी कुंभवली (बोईसर) येथे झाला असून महोत्सवात समाजाची
- पंकज राऊत, बोईसर
हजारो वंजारी समाज बांधवांच्या उपस्थितीत आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणात वंजारी महोत्सवचा शानदार प्रारंभ शनिवारी कुंभवली (बोईसर) येथे झाला असून महोत्सवात समाजाची संस्कृती चाली रीती बोली भाषा आणि जुन्या परंपरा व आठवणीना उजाळा देण्यात आला आहे.
ठाणे-पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळाने वंजारी महोत्सवाचे आयोजन शनिवार व उद्या रविवार असे दोन दिवस करण्यांत आले असून महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पशु पालन व दुग्ध व्यवसाय राज्य मंत्री अर्जुन खोतकर, आ. विलास तरे, आ. अमित घोडा, उद्योजक प्रकाश पाटील, नगराद्यक्ष उत्तम पीम्पळे, माजी महापौर राजीव पाटील वंजारी समाज हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सुधाकर संखे, विद्युत लोकपाल आर. डी. संखे, पालघर जि. प. चे उपाध्यक्ष सचिन पाटील, जि. प. सदस्य रंजना संखे, कार्याध्यक्ष स्मिता पाटील, जेष्ठ सा. कार्यकर्ते प्रदीप पिंपळे व गणपत पींपळे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य मंत्री खोतकर यांनी आज मोठ्याा प्रमाणात समाज बांधव येथे एकत्र आला आहे. हे एक मोठे कार्य आहे तर समाजातील प्रत्येकांनी समाजहित जपून प्रगती साधली पाहिजे असे सांगितले. तर सुधाकर संखे यांनी मंडळा तर्फे समाजाचे सुरु असलेले कार्य आणि विकासा बाबत माहिती दिली प्रदीप पिंपळे यांनी समाज कसा घडला समाजा जुन्या काळातील थोर व्यक्ति व त्यांचे कार्या बाबत सांगितले. सकाळी प्रथम कुंभवलीच्या गावदेवी मंदिरा पासून कार्यक्र मस्थळा पर्यंत वाजत गाजत शोभा यात्रा काढण्यात आली होती त्या मधे बैल गाडींचाही सहभाग होता महोत्सवातील समाज संस्कृती दालन आणि विविध स्टॉल तसेच आरोग्य व रक्त दान शिबिरांचे उद्घाटन करण्यांत आले या वेळी वंजारी गीत आणि पुस्तकांचे प्रकाशनही मान्यवारांच्या हस्ते करण्यांत आले.