महिला बचत गटांचे व्यवहार ठप्प

By admin | Published: November 17, 2016 05:23 AM2016-11-17T05:23:24+5:302016-11-17T05:23:24+5:30

रिझर्व बँकेने बाद चलन स्वीकारण्याबाबत जिल्हा बँकावर निर्बंध घातल्याचा फटका वसई ग्रामीण भागातील महिला बचत गटांना बसला आहे.

The behavior of women savings groups jam | महिला बचत गटांचे व्यवहार ठप्प

महिला बचत गटांचे व्यवहार ठप्प

Next

पारोळ : रिझर्व बँकेने बाद चलन स्वीकारण्याबाबत जिल्हा बँकावर निर्बंध घातल्याचा फटका वसई ग्रामीण भागातील महिला बचत गटांना बसला आहे. त्यांची सर्व पुंजी जिल्हा बँकेत खाते असतांना ही स्वीकारली जात नसल्यामुळे महिला बचत गटाकडे जमा झालेली बाद चलनी बचत कुठे जमा करायची हा प्रश्न निर्माण झाला असून घरी केलेली बचत धोक्यात आली आहे. महिलांनी केलेल्या बचतीच्या या पैशातून महिलांचे आर्थिक सबलीकरण होण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने महिला बचत गटाची सुरु वात केली. या गटांनी एकत्रित केलेली बचत जमा करण्यासाठी जिल्हा बँकेत त्या- त्या बचत गटाचे खाते उघडले. तसेच या बचती नुसार महिलांना व्यवसाय करण्यासाठी या बँकेने कर्ज ही दिले. परंतु आता या बँकेत बाद चलन भरणा करण्यात निर्बध आल्याने महिला बचत गटांपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
४७५ बचत गटांपुढील पेच
वसई पूर्व भागात ४७५ बचत गट आहेत. तसेच त्या मार्फत होणारी बचत गोळा करण्यासाठी दर महा १२ तारखेला महिलांच्या बैठका होऊन बचत गोळा करुन ती आम्ही बँकेत जमा करतो. परंतु या निर्बधामुळे महिलांना कामकाज सोडून बचत भरण्यासाठी फिरावे लागत आहे. त्यामुळे महिला बचत गटासाठी या निर्बंधाचा फेरविचार करावा अशी मागणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा तसेच नगरसेविका जयश्री किणी यांनी केली आहे.

Web Title: The behavior of women savings groups jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.