वसुरी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:29 AM2017-12-09T00:29:19+5:302017-12-09T00:29:26+5:30
तालुक्यातील वसुरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंदाधुंद कारभारची तातडीचे चौकशी करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी देताच ग्रामस्थांनी आरंभीलेले बेमूदत उपोषण शुक्रवारी मागे घेतले आहे
राहुल वाडेकर
विक्रमगड : तालुक्यातील वसुरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंदाधुंद कारभारची तातडीचे चौकशी करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी देताच ग्रामस्थांनी आरंभीलेले बेमूदत उपोषण शुक्रवारी मागे घेतले आहे.
या कार्यालयातून माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी वसुरी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ प्रमोद पाटील, संदीप देसले, निवृत्ती पाटील, सचिन देसले या तरु ण ग्रामस्थाच्या नेतृत्वाखाली वसुरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. या ग्रामस्थांनी तीन महिन्यापूर्वी संबंधित कार्यालयाकडून माहितीच्या अधिकाराखाली अमित दिग्विजय सिंग यांनी ग्रामपंचायत वसुरी यांचेकडून गट नं १/६ व गट नं १/७ मध्ये केलेल्या सर्व बांधकामांबाबतचे अर्ज व त्यांना ग्रामपंचायतकडून दिल्या गेलेल्या सर्व प्रकारच्या परवानग्यांच्या छायांकित प्रति तसेच ग्रामपंचायतीकडे दोन वर्षापासून आलेला निधी, पेसा कायद्यामधील रक्कम व १४ व्या वित्त आयोग इत्यादी निधीचा केलेला उपयोग, इतर सर्व मार्गाने प्राप्त झालेला निधी, त्याचा खर्च यांची माहिती मागवली होती परंतु तीन महिन्यांचा कालावधी उलटून सुद्धा ग्रामपंचायतीने ही माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणाचे अस्त्र उगारले होते. या उपोषणास पंचायत समिती सदस्य विजय वेखंडे शिवसेना युवा उपजिल्हा प्रमुख मनोज खरपडे, भ्रष्टाचार कृती समिती तालुकाध्यक्ष संतोष खांजोडे युवासेना तालुका समन्वयक नितीन सूरकर यांच्यासह तालुक्यातील अनेकांनी पाठींबा दर्शविला होता.
त्याची दखल घेऊन विक्रमगड पंचायत समितीचे गटविकस अधिकारी पवार, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप डोल्हारे, विक्रमगडचे निवासी तहसीलदार ए. सी. कामडी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या अंदाधुंद कारभाराची चौकशी करण्याचे
लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.